'पीएमपी'च्या ताफ्यात डिसेंबरअखेर १६९३ नवीन बस दाखल होणार

'पीएमपी'च्या ताफ्यात डिसेंबरअखेर १६९३ नवीन बस दाखल होणार

'पीएमपी'च्या ताफ्यात डिसेंबरअखेर १६९३ नवीन बस दाखल होणार 

पुणे, ता. २६ - पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात (पीएमपी) नव्याने १ हजार ६९३ बस डिसेंबर अखेरपर्यंत दाखल होणार आहेत. त्यासाठी 'पीएमपी'कडून डेपो आणि पार्किंगसाठी पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि ‘पीएमआरडीए’कडे वेगवेगळ्या ४९ ठिकाणी १०० एकर जागेची मागणी आहे. त्याबाबतची माहिती ‘पीएमपी’चे अध्यक्ष महेश आव्हाड यांनी नगरविकास व परिवहन राज्यमंत्र्यांना दिली.

‘पीएमपी’च्या ताफ्यात सध्या एक हजार ९२५ बस आहेत. त्यापैकी एक हजार ८०० बसच्या माध्यमातून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ‘पीएमआरडीए’च्या हद्दीत प्रवासी सेवा दिली जाते; परंतु सध्या उपलब्ध असलेल्या बस प्रवासी सेवेला कमी पडत आहेत. त्यामुळे नव्या बस घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. येत्या काही दिवसांमध्ये ‘पीएमपी’च्या ताफ्यात नव्या बस दाखल होण्यास सुरुवात होईल.

सध्या दोन्ही महापालिकांनी व ‘पीएमआरडीए’ने दिलेल्या पैशांतून ‘पीएमपी’कडून एक हजार स्वमालकीच्या बसची खरेदी प्रक्रिया पूर्ण झाली असून, त्या बस ताफ्यात लवकरच दाखल होणार आहेत; तसेच भाडेतत्त्वावरील ६९३ बसदेखील डिसेंबरपर्यंत दाखल होतील. याशिवाय पीएम ई-ड्राइव्ह उपक्रमातून ‘पीएमपी’ने एक हजार बसची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. या बस मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे. या गाड्यांसाठी पीएमपी प्रशासनाकडून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ‘पीएमआरएडी’च्या हद्दीत १०० एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories