कुटुंबाचे स्वतःच्या घराचे स्वप्न झाले पूर्ण, 'पीएमआरडीए'च्या १,०२९ घरांसाठी सोडत

कुटुंबाचे स्वतःच्या घराचे स्वप्न झाले पूर्ण, 'पीएमआरडीए'च्या १,०२९ घरांसाठी सोडत

कुटुंबाचे स्वतःच्या घराचे स्वप्न झाले पूर्ण, 'पीएमआरडीए'च्या १,०२९ घरांसाठी सोडत 

पिंपरी, ता. ९ - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) पेठ क्र. १२ आणि ३०-३२ मधील गृहयोजनेतील १ हजार २९ सदनिकांची संगणकीय सोडत बुधवारी (ता. ८) पार पडली आणि अनेक कुटुंबाचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले. 

निगडी-प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात  महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जमीन व मालमत्ता विभाग सहआयुक्त पूनम मेहता आणि प्रशासन सहआयुक्त रुपाली आवले-डंबे यांच्या हस्ते सोडत काढण्यात आली. सोडत प्रक्रियेसाठी नागरीकांची गर्दी झाली होती.  यू-ट्यूब लिंक द्वारेही सोडतीचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. सहआयुक्त पूनम मेहता यांनी सोडत प्रक्रियेची माहिती दिली.  सहायक लेखाधिकारी पूनम बोराटे यांनी सूत्रसंचालन केले. उपायुक्त हिम्मत खराडे यांनी आभार मानले.

 प्रशासन सर्वतोपरी सहाय्य करेल...

''घरासाठी लॉटरी सोडत पारदर्शकपणे राबविण्यात आली. ज्यांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले, त्यांना कर्जप्रकरणे व इतर कार्यालयीन बाबींसाठी प्रशासन सर्वतोपरी सहाय्य करेल. केवळ आर्थिक अडचणींमुळे कोणाचेही स्वप्न अपूर्ण राहू नये, याची काळजी घेतली जाईल.''

- डॉ. अभिजित चौधरी, महानगर आयुक्त, 'पीएमआरडीए'




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories