news
clock
पीएमआरडीए गृहप्रकल्पातील शिल्लक घरांसाठी बुधवारी सोडत

पीएमआरडीए गृहप्रकल्पातील शिल्लक घरांसाठी बुधवारी सोडत

 पीएमआरडीए गृहप्रकल्पातील शिल्लक घरांसाठी बुधवारी सोडत 

पिंपरी, ता. ७ - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पेठ क्रमांक १२ आणि ३०-३२ मधील गृहप्रकल्पातील शिल्लक १ हजार २९ सदनिकांची सोडत जाहीर केली आहे. उद्या, बुधवारी ( ता. ८) निगडी-प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात सकाळी ११ वाजता ही सोडत होणार आहे, अशी  माहिती  ‘पीएमआरडीए’च्या सहआयुक्त (जमीन व मालमत्ता) पूनम मेहता यांनी दिली.

'पीएमआरडीए'च्या पेठ क्रमांक १२ आणि ३०-३२ मधील गृहयोजनेसाठी एकूण ५ हजार ३६७ अर्जदारांनी अनामत रकमेचा भरली होती. अर्जांच्या छाननीनंतर ५० अर्जदारांची कागदपत्रे अपूर्ण असल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात आले. उर्वरित ५ हजार ३१७ अर्जदार आता या सोडतीमध्ये समाविष्ट आहेत. 

सोडत प्रक्रिया ‘म्हाडा’ने विकसित केलेल्या ‘IHLMS २.०’ या संगणकीय प्रणालीद्वारे राबविण्यात येईल. यात मानवी हस्तक्षेपास वाव नसल्याने प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असेल. महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आणि ‘पीएमआरडीए’च्या सनियंत्रण समितीच्या देखरेखीखाली ही सोडत पार पडणार आहे, असे मेहता यांनी सांगितले. 

सोडत प्रक्रियेवेळी अर्जदारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ‘पीएमआरडीए’ने केले आहे. ज्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नाही, त्यांच्यासाठी थेट प्रक्षेपणाची सोय करण्यात आली आहे. सोडत प्रक्रियेची ‘यूट्यूब लिंक’ (YouTube Link) सर्व पात्र अर्जदारांना एसएमएसद्वारे पाठविण्यात येईल, असे ‘पीएमआरडीए’ने सांगितले आहे. 


घरे व अर्जदारांची संख्या -

- पेठ क्र. १२ (EWS): ८१ सदनिकांसाठी २,१८२ अर्जदार

- पेठ क्र. १२ (LIG): ३९३ सदनिकांसाठी १,९७५ अर्जदार

- पेठ क्र. ३०-३२ (EWS): ३२७ सदनिकांसाठी ४५६ अर्जदार

- पेठ क्र. ३०-३२ (LIG): २२८ सदनिकांसाठी ७०४ अर्जदार




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories