‘पीएमआरडीए’ची मोई येथे अतिक्रमणविरोधी कारवाई, ६८० अनधिकृत पत्राशेड जमीनदोस्त

‘पीएमआरडीए’ची मोई येथे अतिक्रमणविरोधी कारवाई, ६८० अनधिकृत पत्राशेड जमीनदोस्त

 ‘पीएमआरडीए’ची मोई येथे अतिक्रमणविरोधी कारवाई, ६८० अनधिकृत पत्राशेड जमीनदोस्त

पिंपरी, ता. १५ जुलै २०२६ - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) खेड तालुक्यातील मोई येथे बेकायदेशीर बांधकामांविरुद्ध आतापर्यंतची सर्वात मोठी आणि ऐतिहासिक कारवाई केली आहे. १३ व १४ जुलै या सलग दोन दिवस चाललेल्या या धडक मोहिमेत सुमारे ३५ हेक्टर क्षेत्रावरील ६८० अनधिकृत पत्राशेड जमीनदोस्त करण्यात आली आहेत. 

'पीएमआरडीए'चे महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या नेतृत्वाखाली तसेच अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी आणि पिंपरी-चिंचवडचे पोलfस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक मोहीम राबविण्यात आली. कोणतीही कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने अत्यंत चोख आणि सूक्ष्म नियोजन केले होते.

🔹 कारवाईची वैशिष्ट्ये -

-  बंदोबस्त : १,००० हून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी, एमएसएफचे जवान आणि सुरक्षारक्षकांच्या फौजफाट्यासह ही कारवाई पार पडली.

- यंत्रणांचा ताळमेळ : पीएमआरडीए, पिंपरी-चिंचवड पोलीस, महावितरण, आरोग्य विभाग आणि खेड पंचायत समिती यांच्या उत्कृष्ट समन्वयामुळे ही मोहीम शांततेत पार पडली.


कडक कारवाई अशीच सुरू राहील.....

“पीएमआरडीएच्या हद्दीत बेकायदेशीर पत्राशेड किंवा बांधकामे खपवून घेतली जाणार नाहीत. नागरिकांनी अशा अनधिकृत बांधकामांच्या आमिषाला बळी पडू नये. आगामी काळातही ही कडक कारवाई अशीच सुरू राहील.”

- डॉ. अभिजीत चौधरी, महानगर आयुक्त, पीएमआरडीए





Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories