शहराच्या विविध भागांतील दारुच्या अड्ड्यांवर पोलिसांची कारवाई

शहराच्या विविध भागांतील दारुच्या अड्ड्यांवर पोलिसांची कारवाई

शहराच्या विविध भागांतील दारुच्या अड्ड्यांवर पोलिसांची कारवाई 

पिंपरी, ता. १ - फुगेवाडी परिसरात नुकतीच हातभट्टीची विषारी दारु प्यायल्याने अनेक नागरीकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी शहरातील दारु अड्ड्यांवर कडक कारवाई सुरु केली आहे. शहर परिसरात अनेक ठिकाणी अवैधरित्या हातभट्टीच्या दारुची, विदेशी मद्याची सर्रास विक्री होत असल्याचे समोर येते आहे. 

विविध ठिकाणच्या अवैध दारुअड्ड्यांवर पोलिसांनी केलेल्या कारावाईचा तपशील पुढीलप्रमाणे - 

- ६५ लिटर तयार हातभट्टीची दारु जप्त 

भोसरी एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्द -  शासनाने प्रतिबंधित केलेली हातभट्टीची दारु विक्रीसाठी बाळगणाऱ्या महिलेविरोधात रविवारी (ता. ३१) भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत, पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस शिपाई निखिल वर्षे (वय ३४ वर्षे) यांनी तक्रार दिली आहे. शासनाने प्रतिबंधित केलेल्या हातभटटी दारुने लोकांच्या जिवितास धोका व इतर विकार होऊन शरीराची हानी होऊ शकते हे माहीत असताना देखील महिला आरोपीने विक्रीसाठी हातभट्टीची दारु बाळगली होती. तिच्या ताब्यामध्ये एकूण ६५००/- रुपये किंमतीची ६५ लिटर तयार हातभटटीची दारु मिळाली. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच ती महिला तिथून पळून गेली. 

सदर महिलेविरोधात भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १२३, महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ (ई) प्रमाणे, भारतीय दंड विधान कलम ३२८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-------------------------------------------------

-  १४० लिटर गावठी दारु जप्त

आळंदी पोलिस स्टेशन हद्दीत - मेदनकरवाडी येथील गवते वस्ती परिसरात गावठी हातभट्टीची दारु बाळगल्याप्रकरणी एका महिलेविरुद्ध आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. ३१) सकाळी साडेसातच्या सुमारास मेदनकरवाडी, गवते वस्ती येथील वनविभागाच्या कार्यालयालगतच्या मोकळ्या जागेत कारवाई करण्यात आली. यावेळी एका महिलेकडे (वय ३६, रा. मेदनकरवाडी, गवते वस्ती, चाकण, ता. खेड) हिच्याकडे बेकायदेशीररीत्या गावठी हातभट्टीची दारु आढळून आली. पोलिसांनी तिच्याकडून प्रत्येकी ३५ लिटर क्षमतेच्या चार कॅनमध्ये साठवून ठेवलेली एकूण १४० लिटर गावठी दारु जप्त केली. जप्त मुद्देमालाची किंमत ९ हजार ८०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 याप्रकरणी पोलीस शिपाई सचिन विष्णु सातपुते यांच्या फिर्यादीवरून आळंदी पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

--------------------------------------------------  ९६ लिटर गावठी हातभट्टी दारु जप्त

- आळंदी पोलिस स्टेशन हद्दीत - विकासवाडी (धानोरे), ता. खेड येथे बेकायदेशीररीत्या गावठी हातभट्टी दारू साठवून ठेवणाऱ्या एका इसमाविरोधात आळंदी पोलिसांनी कारवाई केली. पिंटू नगजी नट (वय ३५, रा. विकासवाडी, धानोरे, ता. खेड) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता. ३१ मे) दुपारी १२.४५ वाजण्याच्या सुमारास विकासवाडी येथील एस. के. इंजिनिअरिंग कंपनीच्या भिंतीच्या आडोशाला आरोपी हा अंदाजे ९६ लिटर गावठी हातभट्टी दारू बाळगून असल्याचे आढळून आले. जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत सुमारे ४ हजार ८०० रुपये असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी पोलीस शिपाई बाळासाहेब विष्णू खेडकर यांनी फिर्याद दिली असून आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९७/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

-------------------------------------------------

- ९० लिटर गावठी दारू जप्त

- आळंदी पोलिस स्टेशन हद्दीत  - मेदनकरवाडी (ता. खेड) परिसरात गावठी हातभट्टी दारूची विक्री करणाऱ्या महिलेवर आळंदी पोलिसांनी कारवाई करून ९० लिटर गावठी दारू जप्त केली. या प्रकरणी दोन महिलांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ मे रोजी दुपारी सुमारे १.५० वाजण्याच्या सुमारास मेदनकरवाडी गाव हद्दीत आळंदी फाटा येथील राजतारा हॉटेललगतच्या परिसरात ही कारवाई करण्यात आली. फुलवंती जयसिंग राठोड (वय ३०, रा. गवतेवस्ती, मेदनकरवाडी) हिच्या ताब्यात दोन काळ्या प्लास्टिक कॅनमध्ये साठविलेली सुमारे ९० लिटर गावठी हातभट्टी दारू आढळून आली. जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे ४ हजार ५०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

तपासादरम्यान सावित्रा सुरेश राठोड (वय ६०, रा. कुरुळी, ता. खेड) ही विक्रीसाठी दारू पुरवित असल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी आळंदी पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम ६५(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस कॉन्स्टेबल अमित अनिल डिखळे यांनी फिर्याद दिली आहे.

-------------------------------------------------

- १०० लिटर ताडी जप्त

- भोसरी एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्द - एमआयडीसी भोसरी पोलिसांनी महात्मा फुलेनगर झोपडपट्टी परिसरात कारवाई करून बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी साठवून ठेवलेली १०० लिटर ताडी जप्त केली. याप्रकरणी दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ मे रोजी दुपारी २.३५ वाजण्याच्या सुमारास फजल हेअर कटिंग सलूनच्या आतील बोळीत, महात्मा फुलेनगर झोपडपट्टी परिसरात ही कारवाई करण्यात आली. राजू भंडारी (वय ३०, रा. महात्मा फुलेनगर झोपडपट्टी, एमआयडीसी भोसरी) याच्या ताब्यात ३ हजार ५०० रुपये किमतीची १०० लिटर ताडी आढळून आली.

चौकशीत ही ताडी मालक शाम मेदनकर (वय ५१, रा. पिंपरी) याच्या सांगण्यावरून विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल केला असून शाम मेदनकर हा अद्याप फरार आहे.

पोलिस शिपाई स्वप्नील नंदकिशोर झनकर यांनी फिर्याद दिली आहे.

-------------------------------------------------

- देशी दारुच्या बाटल्या जप्त

- तळेगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्द - नवलाख उंबे (ता. मावळ) परिसरात बेकायदेशीररीत्या देशी दारू विक्रीसाठी साठवून ठेवणाऱ्या एका तरुणाला तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून ३९ देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ मे रोजी सकाळी ९.४५ वाजण्याच्या सुमारास नवलाख उंबे गाव हद्दीतील सक्षम चायनीज हॉटेलच्या पाठीमागील परिसरात ही कारवाई करण्यात आली. रतन रामकिशन कुमार (वय २२, रा. नवलाख उंबे, ता. मावळ; मूळ रा. सोनभद्र, उत्तर प्रदेश) याच्या ताब्यात देशी दारू ‘पॉवर लाईम पंच’ कंपनीच्या १८० मिली क्षमतेच्या ३९ सीलबंद बाटल्या आढळून आल्या. जप्त दारूची किंमत ३ हजार १२० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोपी हा कोणताही परवाना नसताना देशी दारू विक्रीसाठी बाळगत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस शिपाई नवीन विलास चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे. 

-------------------------------------------------

- ४० लिटर गावठी दारु जप्त

- चिंचवड पोलिल स्टेशन हद्द - दळवीनगर झोपडपट्टी परिसरात गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या एका व्यक्तीविरुद्ध चिंचवड पोलिसांनी कारवाई करून ४० लिटर गावठी दारू जप्त केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ मे रोजी दुपारी १.०५ वाजण्याच्या सुमारास रेल्वे लाईन ब्रिजलगत, रेल्वे पटरीजवळील मोकळ्या जागेत ही कारवाई करण्यात आली. याकोब इसाक मेहत्रे (वय ३४, व्यवसाय प्लंबर, रा. भोईरनगर, चिंचवड) हा तीन प्लास्टिक कॅनमध्ये साठवून ठेवलेली गावठी हातभट्टीची दारू विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

छाप्यामध्ये आरोपीच्या ताब्यातून एकूण ४० लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. जप्त दारूची किंमत सुमारे ४ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी कोणताही परवाना नसताना दारू विक्रीसाठी बाळगत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस शिपाई मनोज जनार्दन पांढरे यांनी फिर्याद दिली आहे. 

-------------------------------------------------

- देशी दारुच्या बाटल्या जप्त

- रावेत पोलिस स्टेशन हद्दीत -  रावेत पोलीस ठाणे हद्दीतील पुनावळे परिसरात देशी दारूची विनापरवाना विक्री करताना एक आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सापडला. या कारवाईत सुमारे ३,२०० रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली आहे.

ही कारवाई  ३१ मे २०२६ रोजी दुपारी १२:४५ वाजण्याच्या सुमारास रानजत्रा हॉटेल, लंडन ब्रिजजवळ, पुनावळे (ता. मुळशी, जि. पुणे) येथे घडली. संशयित आरोपी शहाजी धर्मराज ढगे (वय ५०, रा. पंटवटी सोसायटी, शरदनगर रोड नं. ३, हणुमान मंदिराजवळ, चिखली) याच्यावर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५(ई) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस शिपाई अतुल सिध्दाराम म्हेत्रे (बॅज क्र. ३०६६), रावेत पोलीस ठाणे यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली. आरोपीस बी.एन.एस.एस. कलम ३५(०३) प्रमाणे नोटीस देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई रावेत पोलीस ठाण्याच्या पथकाने केली असून परिसरात अवैध मद्यविक्रीविरोधात कारवाई अधिक तीव्र करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

-------------------------------------------------

- हातभट्टी दारु तयार करण्याचे कच्चा माल जप्त 

- पिंपरी पोलिस स्टेशन हद्दीत - पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल आढळून आल्याची कारवाई पोलिसांनी केली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र प्रोहिबिशन अॅक्टच्या कलम ६५ (फ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई ३१ मे २०२६ रोजी सकाळी सुमारे ७ वाजता भाटनगर, पिंपरी येथील बिल्डिंग क्रमांक ६, चौथा मजला, उजवीकडील खोली क्रमांक १ मध्ये करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांच्या ताब्यातील खोलीत गावठी दारू तयार करण्यासाठी वापरला जाणारा सुमारे ६,८०० रुपये किमतीचा कच्चा माल—जसे की रसायन, नवसागर आणि गूळ—बेकायदेशीररीत्या साठवून ठेवला होता.

या प्रकरणी वर्षा सुरेश भाट (वय अंदाजे ४०, रा. भाटनगर, पिंपरी) आणि तुलसी मनोज रावळकर (वय अंदाजे ४६) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपी अद्याप अटक नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

 पोलीस शिपाई दत्ताजी तानाजी कवठेकर यांनी याबाबत फिर्याद दिली. 

-------------------------------------------------

- २५ लिटर हातभट्टीची २५ लिटर दारु जप्त

- पिंपरी पोलिस स्टेशन हद्द  -  पिंपरी परिसरात बेकायदेशीर हातभट्टी दारूचा साठा आढळून आल्याने पोलिसांनी कारवाई करत एकाविरुद्ध महाराष्ट्र प्रोहिबिशन अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई ३१ मे २०२६ रोजी सकाळी सुमारे ८.२० वाजता संजय गांधी नगर, पिंपरी येथील पत्र्याच्या शेडमध्ये करण्यात आली. या ठिकाणी पोलिसांना अंदाजे २५ लिटर हातभट्टीची तयार दारू तसेच १५ लिटर क्षमतेची लाल रंगाची प्लास्टिक बादली, पांढऱ्या रंगाचा प्लास्टिक डबा आणि दोन प्लास्टिकचे मग असा एकूण सुमारे ३,००० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.

पोलिसांच्या कारवाईदरम्यान आरोपीने पोलिसांची चाहूल लागताच घटनास्थळावरून पलायन केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी एका महिलेविरोधात (वय अंदाजे ५२, रा. संजय गांधी नगर, पिंपरी)  महाराष्ट्र प्रोहिबिशन अॅक्ट कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

-------------------------------------------------

- हातभट्टीची १८ लिटर दारु जप्त 

- पिंपरी पोलिस स्टेश हद्द - पिंपरी परिसरात बेकायदेशीररीत्या हातभट्टी दारूची विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी कारवाई करत एकाविरुद्ध महाराष्ट्र प्रोहिबिशन अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई ३० मे २०२६ रोजी रात्री सुमारे ९.१५ वाजता रामनगर, चिंचवड येथील राम मंदिराच्या पुढील रस्त्याच्या बाजूला करण्यात आली. या ठिकाणी आरोपीकडे अंदाजे १८ लिटर गावठी हातभट्टी दारू तसेच प्लास्टिकचे मग असा सुमारे ४,१२० रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने बेकायदेशीरपणे हातभट्टी दारू बाळगून तिची विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी सुनिल प्रभु शिंदे (वय ४०, रा. रामनगर, चिंचवड, पुणे) याच्याविरुद्ध महाराष्ट्र प्रोहिबिशन अॅक्ट कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस बीएनएसएस कलम ३५ (३) ची नोटीस देण्यात आली आहे

-------------------------------------------------

- ११,३०० रुपयांची देशी-विदेशी दारू जप्त

- तळेगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत -  सुदुंबरे गावच्या हद्दीत बेकायदेशीर दारू विक्रीवर पोलिसांनी कारवाई करत देशी-विदेशी दारूचा मोठा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी एकाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई ३१ मे २०२६ रोजी रात्री सुमारे ८.५० वाजता सुदुंबरे (ता. मावळ) येथील कैलास गाडे यांच्या घराशेजारील पत्र्याच्या शेडजवळ करण्यात आली. या ठिकाणी आरोपीकडे विनापरवाना देशी-विदेशी दारूच्या बाटल्या असा एकूण ११,३०० रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी कैलास ज्ञानोबा गाडे (वय ५५, रा. सुदुंबरे, ता. मावळ, जि. पुणे) हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीररीत्या दारूची साठवणूक व विक्री करताना आढळले.

या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

------------------------------------------------

- १६ हजारांची देशी-विदेशी दारु जप्त

- दक्षिण महाळुंगे पोलिस स्टेशन हद्द - खराबवाडी (ता. खेड) परिसरात बेकायदेशीर दारू विक्रीवर पोलिसांनी कारवाई करत देशी-विदेशी दारूचा साठा जप्त केला असून दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई ३१ मे २०२६ रोजी दुपारी ४.५० वाजता सारा सिटी, खराबवाडी (ता. खेड) येथील इसार पेट्रोल पंपाजवळ करण्यात आली. या ठिकाणी पोलिसांना अंदाजे १६,२७५ रुपये किमतीची देशी-विदेशी दारू विनापरवाना विक्रीसाठी साठवलेली असल्याचे आढळून आले.

या प्रकरणी कुणाल दत्तात्रय दडस (वय २३, व्यवसाय हॉटेल मॅनेजर, रा. इसार पेट्रोल पंपाजवळ, सारा सिटी, खराबवाडी, ता. खेड; मूळ रा. कामोठे, पनवेल, नवी मुंबई) आणि विकी बाळासाहेब खराबे (रा. खराबवाडी, ता. खेड, जि. पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी क्र. १ यास बीएनएसएस कलम ३५ (३) अंतर्गत नोटीस देण्यात आली आहे.

-------------------------------------------------

- ६८ लिटर हातभट्टीची ६८ लिटर दारु जप्त 

- हिंजवडी पोलिस स्टेशन हद्द - कासारसाई परिसरात बेकायदेशीर हातभट्टी दारू विक्रीवर पोलिसांनी कारवाई करत मोठा साठा जप्त केला असून एकाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई ३१ मे २०२६ रोजी दुपारी २.३० वाजता मुळशी क्रिकेट ग्राउंड अकॅडमी, कासारसाई कॅनलजवळील मोकळ्या जागेत करण्यात आली. या ठिकाणी पोलिसांना अंदाजे ६८ लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू आढळून आली, ज्याची किंमत सुमारे ६,८०० रुपये असल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणी लक्ष्मी प्रल्हाद राठोड (वय २६, रा. गव्हाणे वस्ती, टेकवाडी, पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून बीएनएसएस कलम ३५ (३) अंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे.

-------------------------------------------------

- ७ हजारांची दारु जप्त 

- सांगवी पोलिस स्टेशन हद्द -  सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर दारु विक्रीवर कारवाई करत पोलिसांनी दारुचा साठा जप्त केला असून एकाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई ३१ मे २०२६ रोजी रात्री ९.३० वाजता शिवराम नगर, टी.व्ही. सर्विस सेंटरजवळ, पिंपळे गुरव (पुणे) येथे करण्यात आली. या ठिकाणी आरोपी स्वतःच्या राहत्या घराच्या आडोशाने बेकायदेशीर दारूची विक्री करत असल्याचे पोलिसांच्या कारवाईत उघड झाले. या ठिकाणाहून एकूण ७,२८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी एका महिलेवर (वय ५१, रा. शिवराम नगर, सर्वे नं. ३२/४/२, नावेजा रोड, महाराजा हॉटेलजवळ, पिंपळे गुरव, पुणे)  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-------------------------------------------------


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories