विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून पुण्यातून विक्रम काकडे यांना उमेदवारी जाहीर
Jun 01 2026
22
विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून पुण्यातून विक्रम काकडे यांना उमेदवारी जाहीर
पुणे, ता. १ - भाजपचे माजी खासदार संजय काकडे व त्यांचे चिरंजीव विक्रम काकडे यांनी सोमवारी (ता. १) अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. हा पक्षप्रवेश खासदार पार्थ पवार व जय पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात झाला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर, विधान परिषद निवडणुकीसाठी पुण्यातून विक्रम काकडे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारीची घोषणा करण्यात आली. विक्रम काकडे यांनी उमेदवारी अर्जही भरला आहे.
काकडे पितापुत्रांनी पक्षाच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे पुणे शहर व जिल्ह्यात पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक बळकट होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. विक्रम काकडे हे पार्थ पवारांच्या अतिशय जवळचे मानले जातात.
मात्र, पुण्यातील उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांनी निष्ठावंत नेत्यांची नावे पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार यांना सुचवली होती आणि अखेर असंख्य कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार न करता पक्षाने घेतलेल्या या निर्णयामुळे पक्षातील जुने निष्ठावंत नेते नाराज झाले आहेत.
- पार्थ पवार, Parth Pawar, जय पवार, Jay Pawar, राष्ट्रवादी प्रवेश, NCP Joining,
- पुणे पदवीधर मतदारसंघ, Pune Constituency, उमेदवारी जाहीर, Candidate Announcement, उमेदवारी अर्ज, Nomination Filing,
- राष्ट्रवादी काँग्रेस, NCP, विक्रम काकडे, Vikram Kakade, संजय काकडे, Sanjay Kakade,
- विधान परिषद निवडणूक, Maharashtra Legislative Council Election,