पालखी सोहळ्यामुळे पोलिस आयुक्तांची भेट उपक्रम या शुक्रवारपुरता रद्द
पिंपरी, ता. ७ जुलै २०२६ - पिंपरी चिंचवड पोलिसांकडून शहरातील नागरिक व तक्रारदारांसाठी पोलिस आयुक्तांची भेट हा उपक्रम दर शुक्रवारी सकाळी ११.३० ते दुपारी ०१.३० या वेळेत पोलीस आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात येतो. मात्र, या शुक्रवारी (ता. १०) श्री संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा २०२६ अनुषंगाने पोलीस बंदोबस्ताची व्यापक तयारी व अंमलबजावणी सुरु आहे. त्यामुळे हा उपक्रम या शुक्रवारी आयोजित करण्यात येणार नाही.
सदर उपक्रम शुक्रवार दिनांक १७.०७.२०२६ रोजी सकाळी ११.३० ते दुपारी ०१.३० या वेळेत पूर्वनियोजित स्वरुपात आयोजित करण्यात येईल. त्यानंतर हा उपक्रम दर शुक्रवारी नियमितपणे त्याच वेळेत सुरु राहील. नागरिकांनी यांची नोंद घ्यावी व सहकार्य करावे, अशी सूचना पोलिस आयुक्तालयाकडून देण्यात आली आहे.
- Public Grievance, Police Commissioner Office, Friday Public Interaction, Maharashtra Police, Pimpri Chinchwad News, PCMC Police, Palkhi Procession, Police Bandobast, Citizen Facilitat
- Police Commissioner Meet, Commissioner Public Meeting, Palkhi Sohala 2026, Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi, Sant Tukaram Maharaj Palkhi, Pimpri Chinchwad Police Commissionerate
- शुक्रवार उपक्रम रद्द
- संत ज्ञानेश्वर महाराज पालखी, संत तुकाराम महाराज पालखी, पालखी सोहळा
- पिंपरी चिंचवड पोलिस, पोलिस आयुक्तांची भेट