शहरातील रस्ते सुशोभिकरण, देखभालीसाठी 'पीपीपी' आणि 'सीएसआर' धोरण - अभिषेक बारणे

शहरातील रस्ते सुशोभिकरण, देखभालीसाठी 'पीपीपी' आणि 'सीएसआर' धोरण - अभिषेक बारणे

शहरातील रस्ते सुशोभिकरण, देखभालीसाठी 'पीपीपी' आणि 'सीएसआर' धोरण - अभिषेक बारणे

 पिंपरी-चिंचवडच्या सौंदर्यात भर पडणार; सार्वजनिक-खाजगी सहभागातून होणार रस्ते सुशोभिकरण व दुरुस्ती

पिंपरी, ता. ११ ऑगस्ट २०२६ - शहरातील वाढते नागरीकरण आणि सौंदर्यीकरण कायम राखण्यासाठी महापालिकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहरातील प्रमुख रस्ते, आयलंड आणि मध्य दुभाजकांच्या सुशोमीकरणाची व नूतनीकरणाची देखभाल आता पीपीपी (PPP), सीएसआर (CSR) किंवा सीएमआर (CMR) तत्त्वावर करण्यात येणार आहे. यासंदर्भातील धोरणात्मक मसुद्याला स्थायी समितीने मंजुरी दिल्याची माहिती सभापती अभिषेक बारणे यांनी दिली आहे.

​पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या उद्यान व वृक्षसंवर्धन विभागामार्फत शहरातील विविध भागात रस्ते, आयलंड आणि मध्य दुभाजक सुशोभित करण्यात आले आहेत. मात्र, या कामांची दीर्घकालीन आणि योग्य देखभाल करणे प्रशासनासमोर एक मोठे आव्हान होते. हे आव्हान लीलया पेलण्यासाठी आणि महापालिकेवर अतिरिक्त आर्थिक भार न पडता खासगी सहभागातून शहराचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी हे नवीन धोरण तयार करण्यात आले आहे. या धोरणांतर्गत रस्त्यांच्या सुशोभिकरणाची देखभाल पीपीपी किंवा सीएसआर तत्त्वावर देण्याची पॉलिसी अमलात आणली जाणार आहे. 

​या निर्णयामुळे पिंपरी-चिंचवडमधील सार्वजनिक ठिकाणांच्या देखभालीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असून, शहराचे सौंदर्य अधिक बहारदार होईल. स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी घेतलेल्या या दूरदर्शी निर्णयामुळे शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासात आणि सौंदर्यीकरणात भर पडणार आहे.


महापालिकेच्या तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक भार वजा होईल.... 

 "पिंपरी-चिंचवड शहर हे एक प्रगतशील आणि सुंदर शहर म्हणून ओळखले जाते. शहरातील रस्ते, आयलंड आणि दुभाजकांच्या सौंदर्यीकरणावर आपण भर दिला आहे, परंतु त्यांची नियमित व उत्तम देखभाल करणेही तितकेच गरजेचे आहे. महापालिकेच्या तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक भार न पडता, खासगी लोकसहभाग (PPP)आणि सीएसआर (CSR) फंडच्या माध्यमातून ही देखभाल प्रभावीपणे करता येईल. या धोरणामुळे शहराचे सौंदर्य कायम टिकून राहण्यास मदत होईल आणि नागरिकांना अधिक सुंदर व स्वच्छ वातावरण अनुभवायला मिळेल."

- अभिषेक बारणे, स्थायी समिती सभापती, पिंपरी चिंचवड महापालिका

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories