news
clock
प्रा. सुरेखा कटारिया यांचा राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

प्रा. सुरेखा कटारिया यांचा राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

प्रा. सुरेखा कटारिया यांचा राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

पिंपरी, ता. २१ - सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सतर्फे प्रा. सुरेखा कटारिया यांना साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. इन्स्टिट्यूट्सच्या २८ व्या स्थापना दिनानिमित्त बाणेर येथे आयोजित पुरस्कार सोहळ्यात कटारिया यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या समारंभास  सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश उदय ललित, आचार्य चंदन महारा, अभिनेते अशोक सराफ आणि  शिक्षण, प्रशासन, कला आणि सामाजिक कार्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उपप्राचार्य सुरेखा कटारिया यांनी साहित्य क्षेत्रासोबतच सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रातही सातत्याने आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे.

 पिंपरीतील भारतीय जैन संघटना विद्यालयातून उपप्राचार्य पदावरून निवृत्त झाल्यानंतर प्रा. कटारिया यांनी श्री आनंद मंगल एज्युकेशन ट्रस्टची स्थापना केली. त्यांनी अखिल भारतीय महिला साहित्य आणि कला परिषदेचे आयोजन केले. उपक्रमशील व्यक्तिमत्व म्हणून शहरात प्रा. कटारिया यांचा परिचय आहे.

सूर्यदत्ता संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया व सुषमा चोरडिया यांनी प्रा. सुरेखा कटारिया यांच्या कार्याचे कौतुक केले आणि त्यांचा सन्मान केला. डॉ. श्वेता राठोड यांनी मनोगत व्यक्त केले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories