news
clock
मिळकतीची खोटी कागदपत्रे तयार करुन महिलेची १७ लाखांची फसवणूक

मिळकतीची खोटी कागदपत्रे तयार करुन महिलेची १७ लाखांची फसवणूक

मिळकतीची खोटी कागदपत्रे तयार करुन महिलेची १७ लाखांची फसवणूक 

पिंपरी, ता. १० - मिळकतीची खोटी कागदपत्रे तयार करुन एका महिलेची तिच्या नातेवाईकांनी १७ लाखांची फसवणूक केली आहे. ही घटना नोव्हेंबर २०१९ ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत पिंपरीमध्ये घडली आहे. आरोपींवर पिंपरी पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. ९) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फसवणूक झालेल्या महिलेने याबाबत तक्रार दिली आहे. आरोपी अरविंद पंडित खरात (वय ५२ वर्षे रा. कामगार नगर, पिंपरी) व एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका मिळकतीमध्ये फिर्यादी महिला भागीदार आहे हे आरोपींना माहिती होते. तरीही त्यांनी संगनमत करुन  सदर मिळकतीचा अपहार करण्याच्या उद्देशाने बनावट दस्तऐवज तयार केले. आरोपी महिलेने बेकायदेशीरपणे सदर मिळकत अरविंद खरात याच्या एकट्याच नावे करुन फिर्यादी महिलेची एकूण १७,००,०००/- रकमेची  फसवणूक केली आहे. 

आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ६१ (२), ३१६ (२), ३१८ (४), ३३६ (३), ३३८, ३४० (२), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलिस तपास करत आहेत.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories