news
clock
स्वतःचीच दुचाकी डिवायडरला धडकून महिलेचा मृत्यू

स्वतःचीच दुचाकी डिवायडरला धडकून महिलेचा मृत्यू

स्वतःचीच दुचाकी डिवायडरला धडकून महिलेचा मृत्यू 

पिंपरी, ता. १० - स्वतःचीच दुचाकी रस्ता दुभाजकाला धडकल्याने २९ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी (ता. ८) रात्री ११.२० च्या सुमारास चांदणी चौक-बावधन येथे घडला आहे. शारदा नागनाथ तुपसांगवे असे मृत तरुणीचे नाव असून ती कर्वेनगर येथील रहिवासी आहे.

याबाबत, बावधन पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार बळीराम नवले यांनी तक्रार दाखल केली आहे. मयत महिलेवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शारदा या बुधवारी (ता. ८) आपल्या ज्युपीटर दुचाकीवरुन कर्वेनगरला  जात होती. वाहतुकीच्या नियंमांकडे दुर्लक्ष करुन बेदरकारपणे गाडी चालवल्याने चांदणी चौक-बावधन ती येथे स्वतः डिवायडरला धडकून गंभीर जखमी झाली आणि स्वतःच्या मृत्युस कारणीभूत ठरली, असे पोलिसांनी सांगितले. 

मयत शारदा यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम २८१, १०६ (१), १२५ (ब), ३२४ (४), मो. वाहन कायदा कलम ११९/१७७,१८४ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories