दिघी परिसरात वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने गैरवर्तन करणाऱ्या दोघींवर गुन्हा
Apr 17 2026
47
दिघी परिसरात वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने गैरवर्तन करणाऱ्या दोघींवर गुन्हा
पिंपरी, ता. १७ - दिघी परसिरात वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्या दोन महिला आरोपींना गुरुवारी (ता. १६) पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यांना नोटीस बजावली आहे.
याबाबत पोलिस शिपाई योगेश मारूती शेळके यांनी फिर्याद नोंदवली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघी-आळंदी रस्त्यावर आराधना हॉटेलसमोर गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास दोन महिला वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने फिर्यादीस व इतरांना अश्लील हावभाव करत होत्या व अश्लील शब्द उच्चारुत होत्या. त्यांनी फिर्यादीच्या अंगावरुन हात फिरवला. इतरांना अडथळा होईल व सार्वजनिक सभ्यतेचा भंग होईल अशी गैरकृत्य केले.
या महिलांवर दिघी पोलिस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक (प्रतिबंध) अधिनियम १९५६ (पिटा अॅक्ट) चे कलम ०८ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. तसेच त्यांना नोटिस बजावली आहे.