news
clock
स्पा-सेंटरच्या नावाखाली सुरु असलेला वेश्याव्यवसाय उघडकीस

स्पा-सेंटरच्या नावाखाली सुरु असलेला वेश्याव्यवसाय उघडकीस

स्पा-सेंटरच्या नावाखाली सुरु असलेला वेश्याव्यवसाय उघडकीस 

पिंपरी, ता. ३ - मुटकेवाडी-चाक येथे स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेला वेश्याव्यवसाय पोलिसांनी १ एप्रिलला छापा टाकून उघडकीस आणला आहे. या प्रकरणात दोन आरोपींवर गुरुवारी (ता. २) दक्षिण चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ एप्रिलला सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास मुटकेवाडी, नाशिक-पुणे हायवे, चाकण येथील 7 Star Family Spa (शॉप नंबर २१५/२१६, साई कॉर्पोरेट बिल्डींग, दुसरा मजला) येथे पोलिसांनी छापा टाकला. आरोपी  गजानन बाळासाहेब सूर्यवंशी (वय ४४, कात्रज) व मोहन भानुदास तिस्तक (वय ४०, पुणे) यांनी अंजली विजय गायकवाड (वय ३२) या महिलेला पैशांचे आमिष दाखवून तिच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेतला. एका आरोपीने दुसऱ्या आरोपीस जागा उपलब्ध करुन दिली. 

या प्रकरणी आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १४३ (२), ३ (५) अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधकायदा १९५६ चेकलम ३,४,५,७ प्रमाणे दक्षिण चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories