आरएमसी प्लॅन्टच्या त्रासाने वैगातलेल्या नागरीकांनी 'धुळीने भरलेले पोते' दिले प्रशासनाला भेट  ...............आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष रवीराज काळे यांचा पुढाकार, आंदोलनाचाही इशारा

आरएमसी प्लॅन्टच्या त्रासाने वैगातलेल्या नागरीकांनी 'धुळीने भरलेले पोते' दिले प्रशासनाला भेट ...............आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष रवीराज काळे यांचा पुढाकार, आंदोलनाचाही इशारा

आरएमसी प्लॅन्टच्या त्रासाने वैगातलेल्या नागरीकांनी 'धुळीने भरलेले पोते' दिले प्रशासनाला भेट   

आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष रवीराज काळे यांचा पुढाकार, आंदोलनाचाही इशारा 

पिंपरी, ता. ७ - पिंपळे निलख परिसरातील अनधिकृत आरएमसी (रेडी मिक्स काँक्रीट) प्लॅन्टमुळे निर्माण झालेल्या धुळीच्या त्रासामुळे नागरीक प्रचंड त्रासले आहेत. त्यामुळे वैतागलेल्या नागरीकांच्या वतीने आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष रवीराज काळे यांनी थेट पिंपरी-चिंचवड महापालिका अधिकाऱ्यांना रस्त्यावरील धूळ पोत्यात भरुन प्रशासनाला ‘भेट’ दिली आहे. “महापालिका प्रशासनाने या विषयाची गांभिर्याने दखल घेतली नाही, तर आम्ही तीव्र आंदोलन छेडू.” असा इशारा यावेळी काळे यांनी दिला. 

रविराज काळे यांनी म्हटले आहे की, पिंपळे निलख येथील सीएनजी पंपच्या मागील बाजूस ग्रेस्टोन इन्फ्रा व कार्निवल इन्फ्रा या दोन अनधिकृत आरएमसी प्लॅन्ट सुरु असल्याची तक्रार पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाकडे केली होती. त्यानुसार महापालिकेने कारवाई करत संबंधित प्लॅन्टला सील लावले होते. मात्र, प्लॅन्ट चालकांनी सील तोडून पुन्हा काम सुरु केले आहे.

या गंभीर प्रकारानंतरही महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून कोणतीही गुन्हा नोंद करण्यात आली नसल्याने संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) महावितरणला पत्र पाठवून संबंधित प्लॅन्टचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या सूचना दिल्यानंतर महावितरणने वीज कनेक्शन तोडले आहे. तरीदेखील परिसरातील रस्त्यांवरील धुळीचा त्रास कमी झालेला नाही.  परिणामी, त्रस्त झालेल्या नागरिकांच्या वतीने ड प्रभाग कार्यालयात जाऊन आरोग्य विभागाचे अधिकारी व सहाय्यक आयुक्त यांना प्रत्यक्ष धुळ पिशवीत भरून ‘भेट’ देऊन आम्ही निषेध नोंदवत आहोत. 

“महापालिका प्रशासनाने या विषयाची गांभिर्याने दखल घेतली नाही, तर आम्ही तीव्र आंदोलन छेडू.” असा इशारा यावेळी रविराज काळे यांनी दिला. 



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories