news
clock
बांधकाम साईटवर उंचावरुन पडून मजुराचा मृत्यू, ठेकेदारावर गुन्हा

बांधकाम साईटवर उंचावरुन पडून मजुराचा मृत्यू, ठेकेदारावर गुन्हा

बांधकाम साईटवर उंचावरुन पडून मजुराचा मृत्यू, ठेकेदारावर गुन्हा

पुणे, ता. २८ : मुळशी तालुक्यातील पुनावळे परिसरातील एका बांधकाम साईटवर सेंट्रींगचे काम करत असताना मजुराचा उंचावरून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी ठेकेदाराविरुद्ध शुक्रवारी (ता. २७) रावेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत मजूराच्या पत्नीने पोलिसांत तक्रार दिली होती. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे १२:३० वाजता पुनावळे येथील काटे वस्ती परिसरातील पुणेविले कन्स्ट्रक्शन साईट (फेज ३, पी विंग) येथे घडली होती. मजूर उत्पल मनीकांत अधिकारी (वय ४५, मूळ रा. उत्तर २४ परगणा, पश्चिम बंगाल) हे सेंट्रिंगचे काम करत असताना उंचावरुन खाली पडले. त्यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेप्रकरणी शुक्रवारी (ता. २७) वाजता रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित साईटवरील ठेकेदार पंकज पुलीन मंडल (रा. मारुंजी, ता. हवेली, जि. पुणे; मूळ रा. हुगळी, पश्चिम बंगाल) याने कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेली सेफ्टी जाळी, सुरक्षा जॅकेट व इतर साधनांची योग्य व्यवस्था केली नव्हती. यामुळेच कामगाराचा मृत्यू झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १०५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी अद्याप अटकेत नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories