news
clock
पुणे जिल्ह्यात  कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या महिला लाभार्थींमध्ये वाढ

पुणे जिल्ह्यात कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या महिला लाभार्थींमध्ये वाढ

पुणे जिल्ह्यात  कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या महिला लाभार्थींमध्ये वाढ

पुणे, ता. ११ - शेती व्यवसायातील महिलांचा सहभाग वाढत आहे. पुणे जिल्ह्यात कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत यंदा १२ हजार ७१९ शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला. त्यामध्ये दोन हजार १८ महिला लाभार्थ्यांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिली.

महाराष्ट्रात कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत ट्रॅक्टर, पॉवर टिलर, पेरणी यंत्र, फवारणी यंत्र, मळणी यंत्र यांसारख्या आधुनिक शेती अवजारांच्या खरेदीसाठी ४०% ते ८०% पर्यंत अनुदान दिले जाते. हे अनुदान महाडीबीटी पोर्टल (MahaDBT Portal) द्वारे ऑनलाइन लॉटरी पद्धतीने पात्र शेतकऱ्यांना दिले जाते. सामान्य शेतकऱ्यांसाठी ४०-५०% आणि महिला, SC/ST शेतकऱ्यांसाठी ५०% ते ८०% पर्यंत अनुदान मिळते. पुणे जिल्ह्यात या योजनेच्या महिला लाभार्थींमध्ये वाढ झाली आहे.

''शेतीमध्ये  उत्पादनक्षमतेत वाढ करण्यासाठी यांत्रिकीकरण गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना गरजेनुसार दर्जेदार कृषी अवजारे उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात येत आहे. महिला शेतकऱ्यांचा सहभाग वाढत असल्याने त्यांच्या नावाने अर्ज आणि यंत्रसामग्री खरेदीचे प्रमाणही वाढले आहे. महाडीबीटी प्रणालीमुळे प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ झाली आहे.''

- संजय काचोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories