पुणे विमानतळाचे उन्हाळी हंगामाचे वेळापत्रक जाहीर, चार नवीन शहरांसाठी विमानसेवा सुरु
Mar 31 2026
40
पुणे विमानतळाचे उन्हाळी हंगामाचे वेळापत्रक जाहीर, चार नवीन शहरांसाठी विमानसेवा सुरु
पुणे, ता. ३१ - पुणे विमानतळाचे उन्हाळी हंगामाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. यंदाच्या वेळापत्रकात सोलापूर, तिरुपती, बागडोगरा आणि मंगळूर या चार नवीन शहरांसाठी विमानसेवा सुरु होणार आहे. हे वेळापत्रक २९ मार्चपासून लागू करण्यात आले आहे.
नवीन वेळापत्रकात नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) १ मे पासून १५ नवीन स्लॉटना मंजुरी दिली आहे. सध्या २१६ स्लॉटचा वापर सुरु असून, उर्वरित स्लॉट विमानांच्या उपलब्धतेनुसार नवीन कंपन्यांना दिले जातील. नवीन स्लॉटमुळे विमानतळाची क्षमता २३५ स्लॉट झाली आहे आणि दिल्ली, बंगळूर, हैदराबाद व चेन्नई यांसारख्या मेट्रो शहरांच्या फेऱ्यांमध्येही वाढ करण्यात आली आहे, असे विमानतळ प्रशासनाने सांगितले.
महत्त्वाचे पाऊल .....
पुण्याची देशांतर्गत कनेक्टिव्हिटी मजबूत करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल आहे. १५ अतिरिक्त स्लॉटमुळे सोलापूर, तिरुपती आणि मंगळूर यांसारख्या नवीन मार्गावर सेवा सुरु होण्यास मदत होईल.
- संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ
स्लॉट - 'स्लॉट' म्हणजे एअरलाइनला विमान लँड करण्यासाठी आणि नंतर टेक ऑफ करण्यासाठी विमानतळ ऑपरेटरची परवानगी.