news
clock
'ड्रंक अँड ड्राईव्ह' विरोधी विशेष मोहिमेत  ४५५ वाहन चालकांवर कारवाई

'ड्रंक अँड ड्राईव्ह' विरोधी विशेष मोहिमेत ४५५ वाहन चालकांवर कारवाई

'ड्रंक अँड ड्राईव्ह' विरोधी विशेष मोहिमेत  ४५५ वाहन चालकांवर कारवाई

पिंपरी, ता. ४ - होळी आणि धुलिवंदनानिमित्त पुणे पोलिसांनी 'ड्रंक अँड ड्राईव्ह' विरोधी विशेष मोहिम राबवली. या मोहिमेत शहरात ४५५ ट्रिपल सीट आणि मद्यपी वाहन चालकांवर पुणे वाहतूक पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. फेब्रुवारीपासून आजअखेर १५ हजार ट्रिपल सीट दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली.

होळी व धुलिवंदनानिमित्त शहरात अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी व्यापक तपासणी नाके उभारले होते. त्यात मद्य सेवन करून वाहन चालविणाऱ्या ४५५ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. संबंधित वाहनचालकांचे परवाने जप्त करुन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

फेब्रुवारीपासून राबविलेल्या विशेष मोहिमेत १५ हजार ट्रिपल सीट वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. या दुचाकीस्वारांवर १ कोटी ४८ लाख ९५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. त्यापैकी ८८ लाख ५२ हजार रुपये शासनाकडे जमा करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

याशिवाय, येरवडा येथील वाहतूक शाखेच्या कार्यालयात 'ड्रंक अँड ड्राईव्ह' कारवाईतील तीनशे वाहनचालकांचे समुपदेशन करण्यात आले. यावेळी पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी संबंधित चालकांना मद्य सेवन करून वाहन चालविण्याचे दुष्परिणाम समजावून सांगितले. मद्य सेवन करून वाहन चालविणे हा गंभीर आणि दंडनीय गुन्हा आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories