पुणे शहर पूर्व टपाल विभागाच्या वतीने वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ
पिंपरी, ता. १६ - पुणे शहर पूर्व टपाल विभागाच्या वतीने वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ शिवाजीनगर येथील फिरोदिया हॉलमध्ये पार पडला यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले.
पोस्टमास्तर जनरल प्रीती अगरवाल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. प्रवर अधीक्षक समीर महाजन यांनी स्वागत करून विभागाच्या वार्षिक कामगिरीचा आढावा सादर केला.
अगरवाल यांनी पुणे शहर पूर्व विभागाच्या कामगिरीचे कौतुक केले. ग्राहक सेवा अधिक प्रभावी, पारदर्शक ग्राहकाभिमुख सेवा, महसूलवाढ, व्यवसाय विकास, बचत बैंक, विमा व्यवसाय, पार्सल व लॉजिस्टिक सेवा, रिटेल पोस्ट आणि आधार सेवा यांसह विविध क्षेत्रांत विभागाने उल्लेखनीय कामगिरी केल्याचे सांगण्यात आले.
बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करुन भारतीय डाक विभागाच्या विविध योजनां नागरिकांपर्यंत पोचण्याची गरज आहे. पोस्टाची सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी सतत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सतत प्रयत्नशील राहावे, असे अगरवाल यांनी सांगितले.