news
clock
बँकॉकहून पुण्यात आलेल्या विमानात सापडला गांजा

बँकॉकहून पुण्यात आलेल्या विमानात सापडला गांजा

बँकॉकहून पुण्यात आलेल्या विमानात सापडला गांजा 

पिंपरी, ता. ४ -  बँकॉकहून पुण्यात आलेल्या विमानात गांजा सापडला आहे.  सुमारे ७५ लाख रुपये किंमतीचा ७४५ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा (मारिजुआना) विमानाच्या स्वच्छतागृहात लपवून ठेवला होता. हा गांजा पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर जप्त करण्यात आला.  पुणे परिक्षेत्राच्या एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता. ३) ही कारवाई केली.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या बँकॉक-पुणे विमानाच्या स्वच्छतागृहातील टिश्यू कॅबिनेटमध्ये पिवळ्या रंगाचे दोन पाकिटे आढळून आली. तपासणी केली असता, त्या खाद्यपदार्थांच्या पाकिटांमध्ये व्हॅक्युम सीलबंद आठ पाकिटांममध्ये हायड्रोपोनिक गांजा आढळला. हा हायड्रोपोनिक गांजा विमानात कोणी आणि कशा पद्धतीने लपवून ठेवला, याचा शोध घेतला जात आहे. 

एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, काही महिन्यांमध्ये बँकॉकहून पुण्यात हायड्रोपोनिक गांजाची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हायड्रोपोनिक गांजा उच्च प्रतीचा आणि महागडा अमली पदार्थ आहे. त्याच्या सेवनामुळे तरुणांमध्ये व्यसनाधीनता वाढण्याचा धोका असतो. अशा तस्करीविरोधात संशयास्पद हालचाली आढळल्यास नागरिकांनीही संबंधित यंत्रणेला माहिती द्यावी, असे आवाहन एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories