निगडी चौक ते चिंचवड स्टेशन रस्त्याचे ताडडीने डांबरीकरण करावे, अन्यथा चक्का जाम आंदोलन, मनसेचा इशारा

पिंपरी, ता. ४ - निगडीतील टिळक चौक ते चिंचवड स्टेशन या मुख्य मार्गावर सुरु असलेल्या महामेट्रोच्या कामामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे, सातत्याने याबाबत नागरीकांच्या तक्रारी येत आहेत. गेले एक ते दीड वर्ष सुरु असलेल्या या कामामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून अनेक लहान-मोठे अपघात घडत आहेत. या रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा २५ मार्च रोजी निगडी सिग्नल येथे मनसेच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिला आहे.

याबाबत, चिखले यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. निवेदनात चिखले यांनी म्हटले आहे की, निगडी चौक ते चिंचवड स्टेशन दरम्यानचा रस्ता हा शहरातील अत्यंत वर्दळीचा आहे.  या मार्गावरून दररोज हजारो प्रवासी तसेच मोठी आणि लहान वाहने ये-जा करतात. मात्र, महामेट्रोच्या कामामुळे रस्त्याची अवस्था बिकट झाली असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महामेट्रोकडे मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध असतानाही कामाकडे दुर्लक्ष केले जात आहे. 

श्रीकृष्ण मंदिर परिसरातील रस्ता गेल्या एक वर्षांपासून खोदून ठेवला असून तेथे कोणतेही काम झालेले नाही. या रस्त्यांचे तातडीने डांबरीकरण करुन नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा २५ मार्च रोजी निगडी चौकात येथे मनसेच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात येईल, असे चिखले यांनी निवेदनात म्हटले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories

Please Accept Cookies for Better Performance