पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघात महायुतीचा विजय निश्चित : शंकर जगताप

पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघात महायुतीचा विजय निश्चित : शंकर जगताप

पिंपरी-चिंचवड | १५ ऑक्टोबर २०२६ : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केला. निवडणुकीच्या तयारीसाठी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करत मतदारांशी थेट संपर्क वाढवावा, असे आवाहन त्यांनी केले.

चिंचवड येथील आमदार शंकर जगताप यांच्या जनसंपर्क कार्यालयात गुरुवारी (दि. १५) महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक नियोजन बैठक पार पडली. या बैठकीत निवडणुकीची पूर्वतयारी, मतदार संपर्क, प्रचाराचे नियोजन आणि पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांबाबत चर्चा करण्यात आली.

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या भाजप उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ मुरलीधर गावडे यांच्या विजयासाठी महायुतीतील सर्व घटक पक्षांनी समन्वयाने प्रयत्न करावेत, असे जगताप यांनी सांगितले.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी स्थानिक पातळीवर नियोजन करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने आपली जबाबदारी पार पाडून निवडणुकीच्या तयारीला गती द्यावी, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.

आमदार शंकर जगताप यांनी महायुतीतील घटक पक्षांमधील एकजूट आणि परस्पर समन्वय महत्त्वाचा असल्याचे सांगितले. संघटनात्मक ताकदीच्या जोरावर दोन्ही मतदारसंघांतील उमेदवारांना विजयी करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या बैठकीला भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल, सरचिटणीस मधुकर बच्चे, मोरेश्वर शेंडगे, गणेश ढोरे, ॲड. हर्षद नढे, सोमनाथ तापकीर, सनी बारणे आणि मोहन राऊत यांच्यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका आणि भाजपचे मंडलाध्यक्ष उपस्थित होते.

मतदारांशी थेट संवाद, कार्यकर्त्यांमधील समन्वय आणि संघटनात्मक नियोजन या माध्यमातून निवडणुकीची तयारी अधिक प्रभावी करण्यावर या बैठकीत भर देण्यात आला.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories