विधान परिषद निवडणूक पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी १५ उमेदवारी  अर्जांची विक्री

विधान परिषद निवडणूक पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी १५ उमेदवारी अर्जांची विक्री

विधान परिषद निवडणूक पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी १५ उमेदवारी  अर्जांची विक्री

पुणे, ता. २७ : विधान परिषद निवडणुकीसाठी, पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी आतापर्यंत १५ उमेदवारी अर्जांची विक्री झाली असून, अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही. मतदार यादीवरील ४३ हरकतींच्या दुरुस्तीनंतर एक जूनला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन पाटील यांनी बुधवारी (ता. २७) दिली. 

पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, प्रारूप यादीत ८६७ मतदारांचा समावेश असून त्यात ४४१ पुरुष आणि ४२६ महिला आहेत. यामध्ये ७९८ मूळ मतदार, ५६ नामनिर्देशित आणि १३ पंचायत समिती सभापतींचा समावेश आहे. प्राप्त हरकतींवर कार्यवाही करून अंतिम यादी निश्चित केली जाईल. निवडणुकीसाठी जिल्ह्यात ११ मतदान केंद्रे निश्चित केली आहेत. यामध्ये श्री शिवाजी प्रेपरेटरी मिलिटरी स्कूल, पिंपरी-चिंचवड महापालिका पब्लिक स्कूल खराळवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंचर, महात्मा गांधी विद्यालय राजगुरुनगर, विद्याधाम प्रशाला शिरूर, नवीन प्रशासकीय इमारत (तहसील कार्यालय) दौंड, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी हायस्कूल मुलींची शाळा बारामती, एमईएस वाघिरे हायस्कूल सासवड, श्री छत्रपती शिवाजी विद्यालय आणि कन्याशाळा भोर, न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळा वडगाव मावळ आणि रयत शिक्षण संस्थेचे साधना प्राथमिक विद्यालय माळवाडी हडपसर या ठिकाणांचा समावेश आहे. 

दरम्यान, मतदानासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पात्र सदस्यांना मतदानाचा अधिकार राहणार आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका, जिल्हा परिषद, नगरपरिषद, नगरपंचायत तसेच कँटोन्मेंट बोर्ड क्षेत्र सदस्य मतदार म्हणून समावेश आहे.







Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories