सीमाशुल्क व जीएसटी विभागाचे प्रधान आयुक्त शिवाजी हनुमंत डांगे यांची मेट्रो भवनला भेट
सीमाशुल्क व जीएसटी विभागाचे प्रधान आयुक्त शिवाजी हनुमंत डांगे यांची मेट्रो भवनला भेट
पुणे, ता. २८ - मेट्रो भवन, पुणे येथे सीमाशुल्क व जीएसटी विभागाचे प्रधान आयुक्त शिवाजी हनुमंत डांगे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी पुणे मेट्रोच्या विविध प्रकल्पांची सविस्तर माहिती घेतली तसेच जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक आणि अंडरग्राऊंड स्थानकाची पाहणी केली.
या प्रसंगी पुणे मेट्रोचे कार्यकारी संचालक डॉ. श्री. हेमंत सोनावणे (रोलिंग स्टॉक) यांनी श्री. डांगे यांना पुणे मेट्रो प्रकल्पाची माहिती देत विविध तांत्रिक बाबी, प्रवासी सुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञानाविषयी सविस्तर माहिती दिली.
पुणे मेट्रो हा शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम, जलद आणि पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीने उभारण्यात आलेला महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि वेळेची बचत करणारी सेवा उपलब्ध करून देत आहे. अत्याधुनिक अंडरग्राऊंड स्थानके, मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी आणि आधुनिक सुविधांमुळे पुणे मेट्रो शहराच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहे, असे डांगे यांनी सांगितले.