पुणे मेट्रोतील पात्र कंत्राटी कर्मचाऱ्यांना केंद्रीय वेतनश्रेणीनुसार वेतन मिळणार

पुणे मेट्रोतील पात्र कंत्राटी कर्मचाऱ्यांना केंद्रीय वेतनश्रेणीनुसार वेतन मिळणार

पुणे मेट्रोतील पात्र कंत्राटी कर्मचाऱ्यांना केंद्रीय वेतनश्रेणीनुसार वेतन मिळणार 

पिंपरी, ता. १६ जुलै २०२६ -  महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने पुणे मेट्रोतील पात्र कंत्राटी कर्मचाऱ्यांना केंद्रीय वेतनश्रेणीनुसार वेतन लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. 

पुणे मेट्रो रेल कामगार संघाने या मागणीसाठी सातत्याने राज्य सरकार, कामगार मंत्री, तसेच मेट्रो व्यवस्थापनाकडे पाठपुरावा केला होता. यापूर्वी कामगारांना राज्य सरकारच्या दुकाने व आस्थापना नियमांनुसार वेतन दिले जात होते. 

या निर्णयाबद्दल पुणे मेट्रो रेल कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) यांच्या वतीने महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, तसेच मानव संसाधन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उत्तम बोडके यांचा सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories