news
clock
शहराच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही - आयुक्त नवल किशोर राम

शहराच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही - आयुक्त नवल किशोर राम

शहराच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही - आयुक्त नवल किशोर राम 

पुणे महापालिकेचा १३ हजार ९९५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर 

पुणे, ता. १०  - ''पुणे महापालिकेचा १३ हजार ९९५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे. मिळकतकर, बांधकाम शुल्क याद्वारे महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. राज्य शासनाकडून विविध योजनांमधून निधी उपलब्ध होतो. त्यामुळे शहराच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही.'', असे आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.

पुणे महापालिकेला २०२६-२७ या वर्षाचा अर्थसंकल्प नवल किशोर राम यांनी स्थायी समितीसमोर सादर केला. त्यानंतर पत्रकार परिषद झाली. ''१३ हजार ९९५ कोटीचा अर्थसंकल्प अवास्तव नाही.'' असे आयुक्तांनी सांगितले. 

आयुक्त आयुक्त नवल किशोर राम म्हणाले, ''पुणे शहरात सुमारे ३ ते ४ लाख कर आकारणी न होणाऱ्या मिळकती आहेत. त्यांची नोंदणी करुन त्यातून उत्पन्न वाढणार आहे.  अभय योजना राबवूनही थकबाकी न भरणाऱ्या थकबाकीदारांवर कडक कारवाई करून पैसे वसूल केले जातील. समाविष्ट गावात होणाऱ्या बांधकामामुळे तेथून बांधकाम शुल्काचे चांगले उत्पन्न मिळू शकते. शासकीय अनुदान ९३४ कोटी रुपये मिळणार आहे. शासनाकडून अर्बन डेव्हलपमेंट फंड उपलब्ध होतो. त्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.'' 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories