जागतिक पर्यावरण दिनानिमित्त  रहाटणी–काळेवाडी फाटा परिसरात वृक्षारोपण

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रहाटणी–काळेवाडी फाटा परिसरात वृक्षारोपण

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त  रहाटणी–काळेवाडी फाटा परिसरात वृक्षारोपण

पिंपरी, ता. ५ - जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने शुक्रवारी (ता. ५) रहाटणी–काळेवाडी फाटा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.  पर्यावरणप्रेमी मनोज रुपनवर यांच्या पुढाकारातून विविध प्रकारच्या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.

 वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि कमी होत चाललेले हरित क्षेत्र याच्या पार्श्वभूमीवर वृक्षारोपण ही केवळ औपचारिकता नसून भविष्यातील पिढ्यांसाठी हिरवाईची गुंतवणूक आहे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

या वृक्षारोपण कार्यक्रमात नगरसेवक संदीप कस्पटे, सुभाष चव्हाण, राजेश माने, सुनिल भोसले, नंदू आहेर, फेरीवाला क्रांती महासंघाचे प्रमुख काशिनाथ नखाते यांच्यासह अनेक पर्यावरणप्रेमी नागरिक उपस्थित होते. झाडे लावणे ही सुरुवात असते, मात्र त्यांचे संगोपन करून हरित आणि प्रदूषणमुक्त शहर घडविणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. पर्यावरण संरक्षणासाठी समाजाने एकत्र येत अशा उपक्रमांना अधिक बळ देण्याची गरज आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories