पुणे-नाशिक महामार्ग रुंदीकरण व एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया वेगाने करण्याच्या सूचना

पुणे-नाशिक महामार्ग रुंदीकरण व एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया वेगाने करण्याच्या सूचना

पुणे-नाशिक महामार्ग रुंदीकरण व एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया वेगाने करण्याच्या सूचना

पिंपरी, ता. २१ जुलै २०२६ - पिंपरी-चिंचवड शहराच्या वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या पुणे-नाशिक महामार्ग रुंदीकरण आणि प्रस्तावित एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पाच्या अनुषंगाने नुकतीच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादन प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला. तसेच, प्रकल्पाच्या अंमलबजावणीतील अडथळे दूर करून भूसंपादनाची प्रक्रिया अधिक वेगाने पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

बैठकीस महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, नगर रचना विभागाचे उपसंचालक ललित खोब्रागडे, सहायक संचालक श्री. संदेश खडतरे, कनिष्ठ अभियंता श्री. संतोष जगदाळे, NHAI चे प्रोजेक्ट डायरेक्टर श्री. गौतम, सर्व्हेअर श्री. प्रशांत माळी, तसेच विशेष भूसंपादन अधिकारी सौ. उषा विश्वासराव आणि श्री. हर्षद घुले उपस्थित होते.

पुणे-नाशिक महामार्गाचे रुंदीकरण आणि एलिव्हेटेड कॉरिडॉर हा प्रकल्प पिंपरी-चिंचवड आणि पुणे परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे नागरिकांना जलद, सुरक्षित आणि सुलभ प्रवासाचा अनुभव मिळणार असून औद्योगिक आणि आर्थिक विकासालाही मोठी चालना मिळणार आहे. 

बैठकीदरम्यान, प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनींचे अधिग्रहण करताना नागरिकांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न तत्काळ सोडविण्याचे निर्देश देण्यात आले. 

 सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वय साधत निश्चित वेळेत भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी सूचना करण्यात आली. पिंपरी-चिंचवडच्या भविष्यातील पायाभूत सुविधांच्या दृष्टीने हा प्रकल्प 'गेम चेंजर' ठरणार असून, प्रशासनाने त्याच्या कामांना गती देण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे, असे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories