पुणे व पिंपरी-चिंचवडमधील झोपडपट्ट्यांचे 'जीआयएस' मॅपिंग आणि बायोमेट्रिक सर्वेक्षण होणार

पुणे व पिंपरी-चिंचवडमधील झोपडपट्ट्यांचे 'जीआयएस' मॅपिंग आणि बायोमेट्रिक सर्वेक्षण होणार

 पुणे व पिंपरी-चिंचवडमधील झोपडपट्ट्यांचे 'जीआयएस' मॅपिंग आणि बायोमेट्रिक सर्वेक्षण होणार 

पुणे, ता. २० -  पुणे व पिंपरी-चिंचवडमधील झोपडपट्ट्यांचे 'जीआयएस' मॅपिंग आणि बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्याचा निर्णय झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) घेतला आहे.  याद्वारे शहरातील झोपडपट्टयांची संख्या व तेथील रहिवासी यांची अचूक माहिती उपलब्ध होणार आहे. 'जीआयएस' मॅपिंगचे काम शासनाच्या 'एमआर-सॅक' संस्थेला दिले जाणार आहे.  

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या ५५७ झोपडपट्ट्या आहेत. महापालिका हद्दीत ३४ गावांचा समावेश झाल्याने झोपडपट्टयांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे, वाढीव हद्दीसह सर्व झोपडपट्ट्यांची निश्चित संख्या आणि सीमा ठरवण्यासाठी 'जीआयएस' मॅपिंग आणि बायोमेट्रिक सर्वेक्षण केले जाणार आहे. या प्रकल्पात ड्रोनद्वारे झोपडपट्ट्यांचे 'थ्री-डी' मॅपिंग केले जाईल व झोपडपट्ट्यांची हद्द निश्चित केली जाईल. प्रत्येक झोपडीला स्वतंत्र क्रमांक देऊन रहिवाशांचे फोटो आणि बायोमेट्रिक ठसे घेतले जातील. कागदपत्रांच्या पडताळणीसह झोपडीधारकांची अचूक माहिती संकलित केली जाणार आहे.  

झोपडपट्ट्यांच्या 'जीआयएस' मॅपिंग आणि बायोमेट्रिक सर्वेक्षणातून झोपडपट्टी पुनर्वसनाच्या योजनांमधील तांत्रिक अडचणी दूर होतील व पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवता येतील. याबाबत बोलताना, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे  मुख्याधिकारी सतीश खडके म्हणाले, ''पुणे व पिंपरी-चिंचवडमधील झोपडपट्ट्यांचे जीआयएस मॅपिंग आणि बायोमेट्रिक सर्वेक्षणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यातून झोपडीधारक आणि क्षेत्राची अचूक माहिती समोर येईल, ज्याचा फायदा भविष्यातील नियोजनासाठी होईल.''


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories