news
clock
पुणे-सोलापूर विमानसेवा १ मे पासून सुरु होणार

पुणे-सोलापूर विमानसेवा १ मे पासून सुरु होणार

पुणे-सोलापूर विमानसेवा १ मे पासून सुरु होणार 

पुणे, ता. १४ -   पुणे विमानतळावर सोलापूरसाठी सेवा देणाऱ्या स्टार एअर कंपनीला स्लॉट मंजूर झाले असून १ मेपासून ही विमानसेवा सुरु होणार आहे. हवाई वाहतूकीद्वारे प्रथमच ही दोन शहर जोडली जात आहेत, अशी माहिती विमानतळ प्रशासनाने दिली आहे. .

पुणे विमानतळाचा उन्हाळी हंगाम सुरु झाला आहे.  १ मेपासून पुणे विमानतळाला मंजूर झालेले नवीन १५ स्लॉट कार्यान्वित होणार आहेत.  आता दररोजच्या एकूण स्लॉटची संख्या २२० वरून २३५ झाली आहे. नवीन स्लॉटमध्ये पुण्याहून सोलापूर, मंगळूरू व बागडोगरा या शहरांसाठी पुण्याहून पहिल्यांदाच विमानसेवा सुरु होत आहे.

सोलापूरहून विमान पुण्यात दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी दाखल होईल. 

पुणे - सोलापूर - पुणे या सेवेचा फ्लाइट क्रमांक (एस ५-३३१/३३२) असा असणार आहे. ही सेवा  आठवड्यातील सातही दिवस विमानसेवा असणार आहे. शनिवारी मात्र वेळेत बदल असणार आहे. सोमवार ते शुक्रवार दरम्यान सोलापूरहून दुपारी अडीचच्या सुमारास उड्डाण होईल. पुण्यात दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी आगमन होईल. पुण्याहून दुपारी ४ वाजता सोलापूरला उड्डाण होईल. ४ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास सोलापुरात आगमन होईल. शनिवारी सोलापूरहून ४ वाजून २० मिनिटांनी पुण्यात दाखल होईल आणि  पुण्याहून सोलापूरसाठी ४ वाजून ४० मिनिटांनी उड्डाण होईल, असे विमानतळ प्रशासनाने सांगितले आहे. 

याबाबत, पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके म्हणाले, ''पुणे विमानतळाच्या उन्हाळी हंगामात १ मेपासून सोलापूरला विमानसेवा सुरू होत आहे. स्टार एअरची ही विमानसेवा असणार आहे. नवीन स्लॉटमुळे पुण्याची प्रादेशिक व राष्ट्रीय कनेक्टिव्हिटी वाढणार आहे.''




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories