पुणे शिक्षक-पदवीधर निवडणूक; बालेवाडी स्ट्राँगरूमला त्रिस्तरीय सुरक्षा

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणूक; बालेवाडी स्ट्राँगरूमला त्रिस्तरीय सुरक्षा

पुणे | १७ ऑक्टोबर २०२६ : पुणे विभागातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडासंकुलात स्ट्राँगरूम आणि मतमोजणी केंद्रासाठी कडेकोट सुरक्षाव्यवस्था उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावी, यासाठी पोलीस प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.

भारत निवडणूक आयोगाच्या २२ सप्टेंबर २०२६ रोजीच्या पत्रानुसार शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान, तर २७ ऑक्टोबर २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीसाठी २९ सप्टेंबरपासून आदर्श आचारसंहिता लागू झाल्याचे पत्रात नमूद आहे.

पुणे विभागातील या निवडणुकीची मतमोजणी आणि स्ट्राँगरूमची व्यवस्था शिवछत्रपती क्रीडासंकुल (स्टेडियम), बालेवाडी येथे करण्यात येणार आहे.

या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त वसंतराव तेली यांच्यासह प्रादेशिक विभागातील पोलीस उपायुक्त, परिमंडळ-२ मधील पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी स्ट्राँगरूमला भेट दिली.

यावेळी अधिकाऱ्यांनी स्ट्राँगरूमच्या आजूबाजूच्या परिसराची पाहणी करून सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेतला. भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

स्ट्राँगरूम परिसरात डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर, हँड हेल्ड मेटल डिटेक्टर आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. तसेच मतमोजणीच्या दिवशी स्टेडियम आणि परिसरातील वाहतुकीचे नियमन करण्यासाठी वाहतूक विभागाला आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.

निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी संबंधित अधिकारी आणि पोलीस ठाण्यांच्या समन्वयातून बंदोबस्त ठेवण्यावर भर देण्यात आला आहे.

शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक शांत, निर्भय, मुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories