पुण्यातील वाहतूक पायाभूत सुविधांना गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

पुण्यातील वाहतूक पायाभूत सुविधांना गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

पुण्यातील वाहतूक पायाभूत सुविधांना गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

पिंपरी, ता. १७ जुलै २०२६ -  एचसीएमटीआर (High Capacity Mass Transit Route)आणि पीएमआरडीए इनर रिंग रोड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी गठित कार्यकारी समितीची पहिली बैठक पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. 

बैठकीत एचसीएमटीआर प्रकल्पाच्या सुधारित आराखड्याचा आढावा घेऊन भू-संपादन प्रक्रियेला गती देणे, आवश्यक मार्ग बदलांबाबत चर्चा करणे तसेच संबंधित विभागांना निश्चित कालमर्यादेत कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. 

तसेच, पीएमआरडीए इनर रिंग रोड प्रकल्पातील प्रस्तावित बदल, सेवा रस्त्यांची रुंदी, भू-संपादनाशी संबंधित बाबी आणि अंतिम संरेखन (Alignment) निश्चित करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. 

एचसीएमटीआर आणि इनर रिंग रोड या दोन्ही महत्त्वाच्या प्रकल्पांच्या जलद आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी पुणे महानगरपालिकेत विशेष समन्वय कक्ष स्थापन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला असून, संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करून प्रकल्पांची प्रक्रिया गतीमान करण्याच्या सूचना देण्यात आल्या. 

सदर बैठकीला महापालिका सभागृह नेते गणेश बिडकर, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे पिंपरी-चिंचवड शहर, पुणे महानगरपालिका अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) पवनीत कौर, अतिरिक्त आयुक्त (वि) ओमप्रकाश दिवटे, पुणे महानगरपालिका,  शहर अभियंता, मुख्य अभियंता (पथ), पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, मुख्य अभियंता (प्रकल्प), पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, मुख्य अभियंता, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) तसेच मा. प्रादेशिक परिवहन अधिकारी (वाहतूक), पुणे हे उपस्थित होते.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories