सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रश्नपत्रिका खासगी प्रकाशनाच्या पुस्तकातून 'कॉपी-पेस्ट', विद्यार्थ्यांचा संताप

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रश्नपत्रिका खासगी प्रकाशनाच्या पुस्तकातून 'कॉपी-पेस्ट', विद्यार्थ्यांचा संताप

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रश्नपत्रिका खासगी प्रकाशनाच्या पुस्तकातून 'कॉपी-पेस्ट', विद्यार्थ्यांचा संताप

पुणे, ता. १९ - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात  'डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ' (डीटीएल) अभ्यासक्रमाचा १०० गुणांची प्रश्नपत्रिका एका खासगी प्रकाशनाच्या पुस्तकातून जसाच्या तशी घेतल्याचा गंभीर प्रकार नुकताच समोर आला आहे. या प्रकारामुळे तळमळीने अभ्यास करणारे विद्यार्थी  संतापले आहेत.  

१५ मे रोजी 'डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ' या पदविका अभ्यासक्रमाची 'बुक किपिंग अँड अकाउंटन्सी' या विषयाची परीक्षा झाली. सन २०२५ च्या नवीन परीक्षा पद्धतीनुसार ही परीक्षा झाली. विद्यापीठाने काढलेली प्रश्नपत्रिका ही एका खासगी प्रकाशकाच्या 'लॉयर्स कंपॅनियन ऑन बुक किपिंग अँड अकाउंटन्सी फॉर डीटीएल' या पुस्तकातून अगदी कॉपी केली आहे. याशिवाय, प्रश्नपत्रिकेतील हेच आठ प्रश्न २०२३ मध्ये डीईएस श्री नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयात झालेल्या याच विषयाच्या अंतर्गत परीक्षेतही विचारले होते, असे आढळून आले आहे.  या प्रकारावर विद्यार्थ्यांनी ही आमच्या अभ्यासाची आणि गुणवत्तेची क्रूर थट्टा आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 

याबाबत बोलताना, विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. आर. एस. तलवारे म्हणाले की, ''डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ (डीटीएल) अभ्यासक्रमाची शुक्रवारी (ता. १५) झालेल्या 'बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी' विषयाची प्रश्नपत्रिका आणि संबंधित प्रकाशन संस्थेच्या पुस्तकातील प्रश्नांची शहानिशा केली जाईल. त्यानंतर नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल.''


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories