पुढील दोन दिवस विदर्भ वगळता राज्याच्या बहुतांश भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता

पुढील दोन दिवस विदर्भ वगळता राज्याच्या बहुतांश भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता

पुढील दोन दिवस विदर्भ वगळता राज्याच्या बहुतांश भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता 

पुणे, ता. १९ - पुढील दोन दिवस विदर्भ वगळता राज्याच्या बहुतांश भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामध्ये,  पुढील दोन दिवस रत्नागिरी, सातारा आणि साताऱ्यातील घाटमाथ्यावर पाऊस पडेल, पुढील तीन दिवस सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्हा आणि घाटमाथ्यावर पाऊस पडेल. मात्र, पुढील काही दिवस विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे.

मॉन्सूनची वाटचाल वेगाने सुरु असून, संपूर्ण अंदमान आणि निकोबार बेटे व्यापली आहेत. पूर्व मध्य बंगालच्या उपसागरातही मॉन्सून पाहायला मिळत आहे. पश्चिम मध्य प्रदेशापासून ते मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कर्नाटक मार्गे दक्षिण कर्नाटकापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता असताना पुढील काही दिवस विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे, असे हवामान विभागाने सांगितले आहे. 



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories