पुणे शहर व परिसरात आज ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता

पुणे शहर व परिसरात आज ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता

पुणे शहर व परिसरात आज ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता 

पुणे, ता. २५ - पुणे शहर आणि परिसरात आज, सोमवारी (ता. २५) ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असा हवामानशास्त्र विभागाने सांगितला आहे. 

शहर आणि परिसरात रविवारी कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २५.४ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. तराही वातावरणातील उकाडा कायम होता. पुणे आणि परिसरात सोमवारी कमाल आणि किमान तापमानात काहीशी वाढ होणार आहे. कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २५ अंश सेल्सिअस इतके असेल. 

आकाश मुख्यतः निरभ्र राहणार आहे,  दुपारी आणि सायंकाळी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. मंगळवारपासून (ता. २६) कमाल तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाने सांगितले आहे.  



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories