कॉकरोच जनता पार्टी'ची सोशल मिडीया अकाउंट हॅक, संस्थापक अभिजीत दिपके यांची एक्स पोस्टवर माहिती
कॉकरोच जनता पार्टी'ची सोशल मिडीया अकाउंट हॅक, संस्थापक अभिजीत दिपके यांची एक्स पोस्टवर माहिती
पुणे, ता. २३ - कॉकरोच जनता पार्टी अवघ्या काही दिवसांत सोशल मिडियावरुन देशभरात लोकप्रिय झाली. चार-पाच दिवसात या पक्षाचे 1.3 कोटी फॉलोअर झाले.
मात्र, कॉकरोच जनता पार्टीचे इंस्टाग्राम पेज हॅक झाल्याचे, वैयक्तिक अकाउंही हॅक झाल्याचे तसेच एक्स (द्विटर) अकाउंट भारतात ब्लॉक केल्याचे, पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी सांगितले.
दिपके यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, "कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई सुरू आहे. आमचे इंस्टाग्राम पेज हॅक झाले आहे. माझे वैयक्तिक इंस्टाग्राम अकाउंटही हॅक करण्यात आले आहे. एक्स अकाउंट भारतात बंद करण्यात आले असून बॅकअप अकाउंटदेखील हटवण्यात आले आहे."
आणखी एका पोस्टद्वारे सध्या त्यांना त्यांच्या कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रवेश नाही, त्यामुळे पुढील कोणतीही पोस्ट अधिकृत समजू नये, असे आवाहन अभिजीत दिपके यांनी केले आहे.