news
clock
पुरणपोळ्यांचे संकलन करुन गरजूंना वाटप, 'रॉबिनहूड आर्मी'च्या उपक्रम

पुरणपोळ्यांचे संकलन करुन गरजूंना वाटप, 'रॉबिनहूड आर्मी'च्या उपक्रम

पुरणपोळ्यांचे संकलन करुन गरजूंना वाटप, 'रॉबिनहूड आर्मी'च्या उपक्रम 

पिंपरी, ता. ४ -  सामाजिक जाणीवेतून रॉबिनहूड आर्मीच्या पिंपरी-चिंचवड विभागाकडून होळीला साडेपाच हजारांहून अधिक पुरणपोळ्यांचे संकलन करण्यात आले. शहरातील विविध भागांतून नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत या उपक्रमात सहभाग नोंदविला. संकलित करण्यात आलेल्या पुरणपोळ्यांचे बारा ठिकाणी गरजूंना वाटप करण्यात आले.

सणासुदीला 'कोणीही उपाशी राहू नये' या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. होळीदिवशी स्वयंसेवकांनी घराघरांतून पुरणपोळ्या संकलित करून त्यांचे योग्य पॅकिंग व वर्गीकरण केले. त्यानंतर झोपडपट्टी परिसर, कामगार वस्त्या आणि रस्त्यावर राहणाऱ्या गरजूंमध्ये या पोळ्यांचे वितरण करण्यात आले.

या उपक्रमात प्राजक्ता रुद्रवार, उन्मेष चौधरी, मानसी कुमार, आकाश अगरवाल, विजय तळेले, बोमी अरोरा, राहुल पाटील, नीलेश चव्हाणके, जयकिशन यादव यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories