आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा -  महापौर रवी लांडगे

पिंपरी, ता. ४ - ''सांस्कृतिक क्षेत्रात पिंपरी-चिंचवड शहराची ओळख आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यासाठी पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव उपयुक्त ठरणार आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहर हे आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःचा ठसा उमटवत आहे. हा महोत्सव शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा आहे.'', असे प्रतिपादन महापौर रवी लांडगे यांनी केले.

निगडी-प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाचे उद्घाटन मंगळवारी (ता. ३) महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी,

समितीचे सभापती अभिषेक बारणे, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीचे सभापती कैलास कुटे, महापालिकेचे उपायुक्त पंकज पाटील, विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड, चित्रपट दिग्दर्शक सुजय डहाके, अभिनेता क्षितिज दाते, मुख्यमंत्री सहायक शुभम सातकर, चित्रपट निर्माते विजय चौधरी, फिल्म सिटी मुंबईचे जनसंपर्क अधिकारी पंकज चव्हाण, प्रा. डॉ. पांडुरंग भोसले, विजय गुंड, डी. वाय. पाटील फेडरेशनचे विद्यानंद मानकर, मच्छिंद्र धुमाळ, दत्तात्रय गायकवाड, पिंपरी-चिंचवड फिल्म सोसायटीचे दत्ता गुंड, अभिषेक अवचार यांच्यासह नागरिक उपस्थित होते. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहकार्याने आणि पिंपरी-चिंचवड फिल्म सोसायटी, गाथा फिल्म सोसायटी यांच्या वतीने तसेच सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास मंडळ यांच्या संयुक्त सहकार्याने पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२६'चे आयोजन करण्यात आले आहे. ५ मार्चपर्यंत हा महोत्सव ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात सुरु राहणार आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories

Please Accept Cookies for Better Performance