रहाटणीतील तमारा हाऊसिंग सोसायटीतील नागरीकांचे प्रश्न मार्गी लागणार

रहाटणीतील तमारा हाऊसिंग सोसायटीतील नागरीकांचे प्रश्न मार्गी लागणार

 रहाटणीतील तमारा हाऊसिंग सोसायटीतील नागरीकांचे प्रश्न मार्गी लागणार, मागण्या पूर्ण करण्याचे बिल्डरला निर्देश 

पिंपरी, ता. २७ - रहाटणी येथील तमारा हाऊसिंग सोसायटीमधील नागरिकांनी प्रलंबित मूलभूत सुविधांसाठी बिल्डर आणि विकासकांविरोधात शांततापूर्ण साखळी उपोषण सुरु केले होते.  या उपोषणाची दखल आमदार शंकर जगताप यांनी घेतली. आमदार जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली. त्यानंतर, आता बिल्डकडून सर्व समस्या सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. 

आमदार जगताप यांनी तसेच नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी तत्काळ नागरीकांच्या मागण्या जाणून घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला. बैठकीदरम्यान सोसायटीमधील विविध प्रलंबित समस्या, मूलभूत सुविधा आणि नागरिकांच्या तक्रारींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रशासन-बिल्डर यांची बैठक झाली. नागरिकांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचे स्पष्ट निर्देश बिल्डरला देण्यात आले आहेत.  बिल्डरकडून सर्व समस्या सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले असून काही कामांना तत्काळ सुरुवात करण्यात आली आहे. 

या बैठकीस पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या बांधकाम परवानगी विभागाचे सहशहर अभियंता सुनील भगवानी, कार्यकारी अभियंता विजय सोनवणे, जयवंत रोकडे, पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश अलाहट, कनिष्ठ अभियंता प्रताप मोरे, सोसायटीचे पदाधिकारी, सभासद तसेच बिल्डर प्रतिनिधी उपस्थित होते. 






Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories