रायगड किल्ल्यावर जाणारा पायरी मार्ग दुरुस्तीसाठी ३० व ३१ मे रोजी बंद राहणार
पुणे, ता. २२ - स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळा तारखेनुसार ६ जून आणि तिथीनुसार २६ जून रोजी दिमाखात साजरा होत आहे. लाखो शिवभक्त या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव गडावर जाणारा पायरी मार्ग 30 व 31 मे या कालावधीमध्ये पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने जारी केले आहेत.
महाड मार्ग प्रकल्प विभागाने (विशेष पथक रायगड किल्ला) दिलेल्या अहवालानुसार 2023 मध्ये शिवराज्याभिषेक दिन सोहळा आटपून परतताना शिवप्रेमीचा अंगावर गडावरील बाजूच्या उंच कड्यावरून दगड कोसळल्याने मृत्यू झाला होता. त्यामुळे, शिवप्रेमींची सुरक्षितता लक्षात घेता यावर्षी होणाऱ्या सोहळ्यापूर्वी कड्यावरील सैल दगड व धोकादायक भाग हटविण्याची कार्यवाही हाती घेण्यात येत आहे. हे काम प्रशिक्षित गिर्यारोहकांच्या मदतीने करण्यात येणार आहे. कामादरम्यान नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करुन पायरी मार्गावरील वर्दळ पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. संबंधित विभागांना आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
३० व ३१ मे रोजी या ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. नाणे दरवाजा, जगदीश्वर मंदिर (होळीचा माळ) परिसरातील प्रवेशद्वारांवर देखरेख ठेवली जाणार आहे. नागरीकांनी या कामांसाठी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
- जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, District Disaster Management Authority, महाड मार्ग प्रकल्प विभाग, Mahad Road Project Department,
- शिवराज्याभिषेक सोहळा, Shivrajyabhishek festival, सुरक्षा, safety, गडावर जाणे, fort access,
- रायगड किल्ला, Raigad Fort, पायरी मार्ग, staircase route, बंद, closed, ३० मे, 30 May, ३१ मे, 31 May