news
clock
शिधापत्रिकाधारकांसाठी एप्रिल महिन्याचे धान्यवाटप १० एप्रिलपासून सुरु

शिधापत्रिकाधारकांसाठी एप्रिल महिन्याचे धान्यवाटप १० एप्रिलपासून सुरु

शिधापत्रिकाधारकांसाठी एप्रिल महिन्याचे धान्यवाटप १० एप्रिलपासून सुरु

पिंपरी, ता. ८  - शहरातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये एप्रिल महिन्याचे सुमारे ९० टक्के धान्य पुरवठा प्राप्त झाला आहे. उर्वरित धान्य पुढील दोन दिवसांत येणार आहे. १० एप्रिलपासून सोमवार वगळून नियमित धान्य वाटप सुरु होणार आहे. 

मार्च महिन्यात ज्यांचे धान्य न्यायचे राहिले आहे, त्यांना धान्य नेण्यासाठी ७ एप्रिलपर्यंत मुदत दिली होती. आता, १० एप्रिलपासून एप्रिलचे गहू-तांदूळ उपलब्ध होतील. शहरात निगडी (अ), पिंपरी (ज) आणि भोसरी (फ) असे तीन अन्नधान्य वितरण परिमंडळ कार्यरत आहेत. या अंतर्गत एकूण ४,९३,८७४ लाभार्थी नोंदणीकृत असून ३,७१० जण अंत्योदय योजनेत आणि ८८,६४१ लाभार्थी अन्न सुरक्षा योजनेत आहेत. 

लाभार्थी नागरीकांनी वेळेवर आपले धान्य घेऊन जावे, असे पुरवठा विभागाने सांगितले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories