news
clock
रावेतमध्ये ७५ लाखांच्या बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक

रावेतमध्ये ७५ लाखांच्या बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक

रावेतमध्ये ७५ लाखांच्या बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक 

पिंपरी, ता. ११ - रावेत येथे ७५ लाख रुपयांच्या आर्थिक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी गुलाब तुकाराम भोंडवे (वय ६०, रा. रावेत, ता. हवेली, जि. पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी संदीप शिवाजी भोंडवे याने दि. २८ मे २०२१ पासून आतापर्यंत फिर्यादीच्या नावावर असलेल्या ११८ गुंठे जमिनीबाबत बनावट विसार पावती व दस्त तयार केला. या कागदपत्रांवर फिर्यादीसह त्यांच्या कुटुंबीयांच्या बनावट सह्या व अंगठ्याचे ठसे वापरण्यात आल्याचा आरोप आहे.

त्यानंतर नोटरी कागदपत्रांच्या आधारे काही व्यक्तींनी करार करून सुमारे ७५ लाख रुपये स्वीकारण्यात आले. तसेच एका व्यवहारात २० लाख रुपये परत देण्यात आले असतानाही ती रक्कम परत न करता स्वतःकडे ठेवून फिर्यादीची आर्थिक फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१६ (२), ३१८ (४), ३३६ (२), ३३६ (३), ३३८ आणि ३३९ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. तपास पोलिस करत आहेत.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories