आळंदी पोलिसांची मोठी कारवाई, दरोड्याच्या तयारीत असलेला पाच जणांचा टोळक्याला अटक
Apr 11 2026
62
आळंदी पोलिसांची मोठी कारवाई, दरोड्याच्या तयारीत असलेला पाच जणांचा टोळक्याला अटक
पिंपरी, ता. ११ - खेड तालुक्यात धानोरे गावच्या हद्दीत, आळंदी ते मरकळ रस्त्यावरील पॉलीबॉड कंपनीसमोर रस्त्याच्या कडेला दरोड्याच्या तयारीत दबा धरून बसलेल्या पाच जणांच्या टोळक्याला आळंदी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई शुक्रवारी (ता. १०) करण्यात आली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदिप लक्ष्मण दोडके (वय ४२, व्यवसाय नोकरी, पोलीस हवालदार, बक्कल क्रमांक १७७८, नेमणूक आळंदी पोलीस स्टेशन, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय) यांच्या तक्रारीवरुन ही कारवाई करण्यात आली.
आरोपींमध्ये मोहम्मद इब्राहिम अनिस चौधरी (वय १९ वर्षे, रा. कुदळवाडी, चिखली), जिशान महंमद सहिर सय्यद खान (वय १८, रा. बालघरे वस्ती, कुदळवाडी), जमाल आशिक अली हाशमी (वय १९, रा. मोरे पाटील चौक, कुदळवाडी), शिवकुमार निरंजन चौव्हाण (वय १९, रा. मोरे चौक, कुदळवाडी) आणि सलमान जुबैर बागवान (वय १८, रा. मोरे पाटील चौक, कुदळवाडी) यांचा समावेश आहे. यापैकी पाचही आरोपींना अटक करण्यात आली आहे. तीन असून तीन अल्पवयीन गुन्हेगार आहेत, अशी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
घटनास्थळी पोलिसांना ९ मोबाईल फोन, ४ लोखंडी कोयते, एक टाटा कंपनीचा छोटा हत्ती, एक स्प्लेंडर प्लस मोटरसायकल, एक ज्युपिटर, एक अॅक्टिव्हा स्कूटर आणि एक नायलॉन दोरी असा एकूण ८ लाख ४४ हजार ९६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१० (४) व ३१० (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. पोउनि दुधमल हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.