किरकोळ कारणावरुन एका रिक्षाचालकाची दोघांना मारहाण
पिंपरी, ता. ३० - किरकोळ कारणावरुन झालेल्या वादातून एका रिक्षाचालकाने दुसऱ्या रिक्षाचालकाला व त्याच्या नातेवाईकास मारहाण करुन जखमी केले. ही घटना रविवारी (ता. २९) सायंकाळी ६ च्या सुमारास रावेत येथील लंडन ब्रीज रिक्षा स्टॅन्ड जवळ घडली. आरोपीला पोलिसांनी नोटीस दिली आहे.
याबाबत, रोहित नामदेव गोंदिल (वय २४ वर्ष, रिक्षा चालक, रा. जांभेगाव, ता. मुळशी) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी गणेश दादू जाधव (वय ३७, रा. महात्मा फुले नगर, एमआयडीसी भोसरी) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(१) व ११५(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला नोटीस बजावली आहे.
आरोपी हा त्याच्या ताब्यातील ऑटो रिक्षा घेऊन रिक्षा स्टॅण्डजवळ थांबला होता. त्यावेळी फिर्यादी रोहित यांचे दाजी सागर संपत मिरगणे यांनी त्याला “येथे रिक्षा थांबवू नको, मागे वाहतूक कोंडी होत आहे” असे सांगितले. त्याचा आरोपीला गणेशला राग आला व त्याने सागर मिरगणे यांना धक्का-बुक्की केली. त्यांनी विरोध केल्यावर आरोपीने हातातील कडे त्यांच्या नाकावर मारुन दुखापत केली. रोहित भांडण सोडविण्यासाठी गेला असता त्यालाही आरोपीने कड्याने नाक व कपाळावर मारहाण करुन जखमी केले.