पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा, सहा जणांवर गुन्हा दाखल
पिंपरी, ता. ३० - चिंचवड परिसरात जुगार खेळणाऱ्या सहा जणांविरुद्ध संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (ता. २) चिंचवडमधील आण्णासाहेब मगरनगर, नविन पत्राशेड, डी मार्टच्या पाठीमागे मोकळया जागेत करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आण्णासाहेब मगरनगर, डी-मार्टच्या पाठीमागील मोकळ्या जागेत काही जण तीन पत्ती जुगार खेळत होते. पोलिसांनी छापा टाकून आरोपींकडून सुमारे ९,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
आरोपींमध्ये तुकाराम कुसाळकर (वय ५५), निलू जाधव (वय ४५), रवी चव्हाण (वय ३६), देविदास शिंगाडे (वय ५०), मनोज गुंजाळ (वय ३६) आणि विशाल काकडे (वय २६) यांचा समावेश आहे. आरोपींना अटक केली नाही. या प्रकरणी दत्तू नंदू पाटेकर (पोलीस शिपाई, संत तुकारामनगर पोलीस ठाणे) यांनी फिर्याद दिली. संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.