news
clock
सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्यांचा पोलीस आयुक्तालयात सन्मान

सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्यांचा पोलीस आयुक्तालयात सन्मान

सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्यांचा पोलीस आयुक्तालयात सन्मान 

पिंपरी, ता. ३१ - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील ३ पोलीस अंमलदार मंगळवारी (ता. ३१) सेवानिवृत्त झाले. त्यांचा निरोप समारंभ पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय येथील 'शिवनेरी हॉल'मध्ये झाला. 

भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अशोक पवार,  पोलीस मुख्यालयातील पोलीस उपनिरीक्षक राजू तानाजी चौधरी व पोलिस शिपाई शिवाजी गोरे हे सेवानिवृत्त झाले. पोलीस सह आयुक्त शशिकांत महावरकर,  पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) गणेश इंगळे यांच्या हस्ते सेवानिवृत्त झालेल्या पोलीस अंमलदारांचा त्यांच्या कुटुंबियांसह शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सेवानिवृत्त प्रमाणपत्र, ओळखपत्र, शुभेच्छापत्र, स्मृतिचिन्ह, झाडाचे रोपटे, भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना पुढील जीवनासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. 

सदर कार्यक्रमास वरिष्ठ पोलीस निरिक्षक संजय नरावाड (कल्याण शाखा), सहायक पोलीस निरीक्षक  राकेश भामरे तसेच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील कर्मचारी व सेवानिवृत्त झालेले पोलीस अंमलदार यांचे नातेवाईक उपस्थित होते.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories