news
clock
भोंदू खरातसारखेच भोंदू ऋषिकेश वैद्यचे आणखी एक प्रकरण उघड

भोंदू खरातसारखेच भोंदू ऋषिकेश वैद्यचे आणखी एक प्रकरण उघड

भोंदू खरातसारखेच भोंदू ऋषिकेश वैद्यचे आणखी एक प्रकरण उघड

पिडीत तरुणीने धाडसाने नोंदवली तक्रार, भोंदू ऋषिकेश वैद्यला पिंपरीतून अटक

पुणे, ता. २८ - भोंदू अशोक खरातसारखेच आणखी एक प्रकरण उघड झाले आहे. वसईमधील भोंदू ऋषिकेश वैद्य याने आपण महादेवाचा अवतार असल्याचे सांगून तरुणीवर पुण्यात तसेच वसईमध्ये बोलावूनही अत्याचार केलाय. संबंधित तरुणीने आता निर्भिडपणे या भोंदूविरोधात तक्रार दिली आहे. 

त्यानुसार, भोंदू वैद्यविरोधात वसईतील माणिकपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पुण्यातील मांजरी पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. गुन्हे शाखेने शनिवारी (ता. २८) भोंदू वैद्यला पिंपरीतून अटक केली आहे. दुपारी त्याला 

भोंदू अशोक खरातचे प्रकरण उडकीस आल्यानंतर धाडसाने पुढे येऊन एका पिडीत तरुणीने वैद्यची तक्रार 

वसईतील माणिकपूर पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी मूळची पुण्यातील आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये महिलेची सोशल मीडियाद्वारे भोंदूशी ओळख झाली. भोंदू वैद्य हा मूळचा वसईचा आहे. पीडित महिला व्रतवैकल्ये करायची, तसेच ती धार्मिक आहे. भोंदूने तिला जाळ्यात ओढले. माझ्यात दैवी संचार आहे. ईश्वराची उपासना कशी करायची, याचे तंत्र तुला शिकवतो, असे सांगून त्याने महिलेला जाळ्यात ओढले. आरोपी सन २०२३ मध्ये पुण्यात आला. त्याने पीडित महिलेची भेट घेतली. मांजरी परिसरात तो तिला भेटला. त्यानंतर त्याने गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यावेळी त्याने छायाचित्रे काढून तिला धमकावण्यास सुरुवात केली. आरोपीने तिला वसईत बोलवून तिथेही तिच्यावर अत्याचार केला, असे संबंधित तरुणीने तक्रारीत सांगितले आह

हा गुन्हा तपासासाठी पुण्यातील हडपसर जवळील मांजरी पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला. पोलिसांनी वैद्यच्या शोधासाठी पथके तयार केली होती. दरम्यान, भोंदू वैद्य फरार झाला होता. पुणे व वसई पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत होता. वैद्य पिंपरीमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. वैद्य हा आपल्या नातेवाईकांकडे जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला पिंपरीतून अटक केली असून शनिवारी (ता. २८) दुपारी त्याला शिवाजीनगर कोर्टात हजर केले जाणार आहे, असे पुणे शहर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी सांगितले. 

भोंदू वैद्य संबंधित गुन्ह्याचा तपास पुणे पोलिस करत आहेत.  या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे. भोंदू वैद्य याने आणखी काही महिलांवर अत्याचार केल्याची शक्यता आहे. अशा प्रकारची तक्रार असल्यास पीडित महिलांनी पुणे पोलिसांकडे तक्रार द्यावी, असे आवाहनही पोलिस उपायुक्त पिंगळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories