संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज दुपारी अडीच वाजता प्रस्थान, विविध कार्यक्रमांना प्रारंभ

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज दुपारी अडीच वाजता प्रस्थान, विविध कार्यक्रमांना प्रारंभ

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज दुपारी अडीच वाजता प्रस्थान, विविध कार्यक्रमांना प्रारंभ

पिंपरी, ता. ७ जुलै २०२६ - आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज मंगळवारी (ता. ७) देहू येथून दुपारी अडीच वाजता प्रस्थान होणार आहे. पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी देहूतील मुख्य मंदिरात तयारी करण्यात आली आहे. मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई, टाळ-मृदुंगाचा गजर आणि सकाळच्या सत्रातील धार्मिक कार्यक्रमांनी वातावरण मंगलमय झाले आहे. श्री तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व वारकरी बांधवांना पंढरपूर वारीच्या मंगलमय शुभेच्छा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. 

मुसळधार पावसामुळे यंदाचा सोहळा मर्यादित असणार आहे. तराही देहूमध्ये दाखल झालेल्या वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह आहे.  मुख्य देऊळवाड्यात वारकऱ्यांची दर्शनासाठी गर्दी झाली आहे. संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी मानकरी, सेवेकरीही दाखल झाले. पालखी सोहळ्यात यंदा नवीन चांदीचा रथ बनविण्यात आला आहे.  वारकऱ्यांसाठी देहू नगरपंचायत प्रशासनाने सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने विविध ठिकाणी बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे. 

आज पहाटे पाच वाजता  'श्रीं'ची आणि शिळा मंदिर महापूजा, पहाटे ५.३० वाजता तपोनिधि नारायण महाराज समाधी पूजा, सकाळी ९ वाजता पादुका महापूजा, इनामदार वाडा व सकाळी १० वाजता काल्याचे किर्तन असे कार्यक्रम पार पडले. दुपारी २.३० वा. प्रस्थान सोहळ्यास प्रारंभ होणार आहे. सायंकाली ५ वाजता पालखी मंदिर प्रदक्षिणा करेल. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता समाजआरती होईल व पालखी इनामदार वाड्यात मुक्कामासाठी मार्गस्थ होईल. 

 संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे उद्या प्रस्थान - 

आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे उद्या, बुधवारी प्रस्थान होणार आहे. त्या अनुषंगाने नवीन रथ अर्पण सोहळा सोमवारी आयोजित केला होता; परंतु मुसळधार पावसामुळे कार्यक्रम स्थगित करण्यात आला. पावसामुळे प्रस्थान सोहळाही मर्यादित स्वरूपात आहे. वारकरी, मानकरी, ग्रामस्थ, पोलिस आदी १६६० जणांना फक्त मंदिर प्रवेश असणार आहे. 





Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories