news
clock
महिंद्रा लॉजिस्टिक व स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटनेत वेतनवाढ करार

महिंद्रा लॉजिस्टिक व स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटनेत वेतनवाढ करार

महिंद्रा लॉजिस्टिक व स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटनेत वेतनवाढ करार 

पिंपरी, ता. २ - महिंद्रा लॉजिस्टिक लिमिटेड आणि स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना यांच्यात तिसरा वेतनवाढ करार झाला. या करारासाठी आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला. हा करार लॉजिस्टिक उद्योगातील सर्वांत मोठा करार ठरला आहे. चाकण औद्योगिक वसाहतीत निघोजे येथील कंपनीच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात औपचारिकरित्या करार केला गेला. करारानंतर कामगारांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केलो. 

करार करण्याच्या औपचारिक कार्यक्रमात संघटनेच्या वतीने प्रमुख सल्लागार आमदार महेश लांडगे, रोहिदास गाडे, अध्यक्ष जीवन येळवंडे, असोसिएट व्हाईस प्रेसिडंट-एचआर संजय गावडे आणि असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट एच. आर. प्रदीप झोटिंग, धीरज सिंह, निंबा भांबरे, नामदेव टाचतोडे, राहुल भागवत  प्रमुख उपस्थित होते. 

करारातील प्रमुख सुविधा पुढीलप्रमाणे आहेत. यामध्ये एकूण पगारवाढ: ₹15,500/- (CTC मध्ये), रेशो ३०%, ३०%, ४०%, विभागणी २५% DA बेसिक, ७५% इतर अलाऊन्स. कराराचा कालावधी: ०१/०३/२०२६ ते ३१/०८/२०२९ (साडेतीन वर्षे). रजा सुधारणा: ३६६ कामगारांच्या रजेत ३ दिवसांची वाढ, सर्वांसाठी समान रजा. पगाराची उचल: ग्रॉस पगाराच्या तीनपट वैद्यकीय कारणांसाठी मंजूर. ग्रुप एक्सीडेंट पॉलिसी: ₹5 लाख. ग्रुप टर्म इन्शुरन्स पॉलिसी: ₹5 लाख. करार वेळेत पूर्ण होण्याबद्दल बक्षीस: ₹7,500/- सर्व कामगारांना. बोनस: मागील आर्थिक वर्ष २४–२५: ₹39,200/-, २०२६–२९ दरम्यान वाढीव रक्कम: ₹43,800 ते ₹59,100/-उत्पादन वाढ: पहिल्या तीन वर्षांत दर वर्षी ७%, पुढील सहा महिन्यांसाठी ३.५% असा आहे.


कामगारांच्या जीवनमानात सुधारणा.....


“महिंद्रा लॉजिस्टिकमधील कामगार हे फक्त आमच्या कंपनीचे आधारस्तंभ नाहीत, तर ते उद्योगाचा आत्मा आहेत. या कराराद्वारे आम्ही फक्त पगारवाढ देत नाही, तर कामगारांच्या जीवनमानात खऱ्या अर्थाने सुधारणा घडवून आणत आहोत. रजा, बोनस, आरोग्य सुरक्षा आणि उत्पादन वृद्धी यासारख्या सर्व बाबींचा विचार करून हा करार करण्यात आला आहे.”

– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.





Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Recent News

Top Categories