डिव्हायडरला दुचाकी धडकून एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी, सांगवीमधील अपघात

डिव्हायडरला दुचाकी धडकून एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी, सांगवीमधील अपघात

डिव्हायडरला दुचाकी धडकून एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी, सांगवीमधील अपघात

पिंपरी, ता. २ - बेदरकारपणे  दुचाकी चालवणाऱ्या एका युवकाची दुचाकी रस्ता दुभाजकावर जोरदार धडकल्याने दुचाकीवर मागे बसलेल्या त्याच्या मित्राचा मृत्यू झाला व दुचाकी चालवणारा युवक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात सुदर्शन चौक, नवी सांगवी येथे रविवारी (ता. ३१) मध्यरात्री घडला आहे. या प्रकरणी दुचाकी चालवणारा जखमी युवक आकाश रंजन कदम (वय २४ वर्ष, रा. शनी मंदिर जवळ, संत तुकारामनगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

प्रज्वल प्रशांत शिंदे (वय २२ वर्षे, शिक्षण, रा. गोकुळनगर, धानोरी) याने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  आरोपी आकाश कदम याने त्याच्या ताब्यातील दुचाकी  भरधाव वेगाने, अविचाराने, हयगयीने चालवत वाहतुकीच्या नियमनाचे उल्लघंन केले. यात त्याची दुचाकी डिव्हायडरला जोरात धडकली. या धडकेत दुचाकीवर त्याच्या पाठीमागील सीटवर बसलेला फिर्यादी यांचा मित्र अमन आयाज शेख (वय २२ वर्ष रा. वल्लभनगर) हा गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला आहे. 

आरोपीवर सांगवी पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. १) भारतीय न्याय संहिता  कलम १०६ (१), २८१,१२५ (ए), १२५ (बी), मोटार वाहन कायदा कलम १८४, ११९/१७७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories